बोरवेल्सच्या गाडीचा विजेच्या तारेला स्पर्श; दोघांचा मृत्यू

बोरवेल्सच्या गाडीचा विजेच्या तारेला स्पर्श; दोघांचा मृत्यू

परळी प्रतिनिधी:-  परळी जवळ बोरवेल्सच्या गाडीचा विजेचा तारेला स्पर्श झाल्याने, दोघाजणांचा मृत्यू तर दोघेजण गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना आज मंगळवार दिनांक 30 जानेवारी रोजी दुपारी घडली आहे.

बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील वाघबेट येथे, ओरिसा राज्यातून बोरवेल्स ची गाडी बोर घेण्यासाठी आली होती. या गाडीसोबत सहा व्यक्तींचा समावेश होता .बोर चे काम झाल्यानंतर सदर गाडी परळीच्या दिशेने येत होती. मात्र या गाडीचा विजेच्या तारेला स्पर्श झाल्याने विद्युत प्रवाह गाडीमध्ये उतरल्याने, सहा मजुरा पैकी दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य दोघे जखमी झाले. आहेत हे सर्व मजूर ओरिसा राज्यातील आहेत. यामध्ये गोविंदा धवन सिंग आणि संदीप असे मयताचे नाव आहे. अन्य दोन जखमी मजुरांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow