ब्रेकिंग : भाजपचा बडा नेता काँग्रेसमध्ये

ब्रेकिंग : भाजपचा बडा नेता काँग्रेसमध्ये
यादव यांनी मंगळवारीच भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर ते चारशे वाहनांच्या ताफ्यासह भोपाळला पोहोचले. त्यांचा एवढा मोठा गाड्यांचा ताफा पाहून सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केलं. बैजनाथ यादव यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांना घेऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यादव हे ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यासोबतच काँग्रेसमधून भाजपमध्ये सहभागी झाले होते. मात्र मिळत असलेल्या माहितीनुसार त्यांचं भाजप नेत्यासोबत न जमल्यानं त्यांनी पुन्हा एकाद काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

यादव यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना त्यांच्या मतदासंघात काम करण्यामध्ये अनेक अडचणी येत होत्या, त्यामुळे त्यांनी पुन्हा एकाद काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याची चर्चा सुरू आहे. यादव यांची पत्नी कमला यादव या शिवपुरी जिल्हा पंचायतच्या माजी अध्यक्ष आहेत. गेल्या दोन दिवसांत भाजपला मध्य प्रदेशात दोन मोठे धक्के बसले आहेत. बुधवारी भाजपचे माजी आमदार आणि मंत्री अंखड प्रताप सिंह यांनी आम आदमी पार्टीमध्ये प्रवेश केला तर आज ज्योतिरादित्य सिंधिया यांचे कट्टर समर्थक बैजनाथ यादव यांनी पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये घरवापसी केली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow