कुंडलिका नदीच्या पुलावरून कार नदीत कोसळली, अनेक जण जखमी, कारचे नुकसान

कुंडलिका नदीच्या पुलावरून कार नदीत कोसळली, अनेक जण जखमी, कारचे नुकसान

बीड प्रतिनिधी:- कुंडलिका नदीच्या पुलावरून कार नदीत कोसळल्याची घटना चिंचवन जवळ, आज रविवारी सकाळी दहा वाजता घडली आहे. यामध्ये सहा जण जखमी झाले असून कारचे मोठे नुकसान झाले आहे.

धारूर वडवणी रस्त्यावर चिंचवन जवळ ,कुंडलिका नदीच्या पुलावरून कार नदीत कोसळल्याची घटना घडली आहे. सदर घटना आज रविवार दिनांक 21 एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता घडली. यामध्ये सहा जण जखमी झाले आहेत. यामध्ये दोन पुरुष दोन महिला तर दोन मुलांचा समावेश होता. वडवणी तालुक्यातील चिंचवन जवळ कुंडलिका नदीवरचा हा पूल असून, खराब रस्ता असल्याने, खड्डा चुकवत असताना, चालकाचा ताबा सुटल्याने,भरधाव वेगात पुलाजवळ आलेली कार कठडे नसल्याने खाली नदीत कोसळली आहे. मारुती सुझुकी वॅगनार कंपनीची ही कार होती. एम एच 14 सी सी 65 77 या क्रमांकाची वेगनार कंपनीची सदर कार होती. यावेळी सदर घटनेची माहिती मिळताच, घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी केली होती. यावेळी तात्काळ नागरिकांनी मागच्या दरवाज्याद्वारे सर्वांना बाहेर काढले व तात्काळ उपचारासाठी त्यांना रुग्णालयात हलवले. मात्र कार नदीत कोसळून पलटी झाल्याने, कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. तरी सदर रस्त्यावरील खड्डे तात्काळ दुरुस्त करावे पुलावर कठळे बसावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow