कोळगाव तांदळा भागात चकलांबा पोलिसांची आज पुन्हा अवैध दारूवर कारवाई

कोळगाव तांदळा भागात चकलांबा पोलिसांची आज पुन्हा अवैध दारूवर कारवाई

बीड प्रतिनिधी:- चकलांबा पोलिसांची आणखी एक धडाकेबाज कारवाई, ड्राय डे च्या दिवशी दोन अवैध दारू विक्रेत्यांवरती धाड टाकली असून त्यांच्याकडून 21740 रुपयाचा देशी विदेशी दारूचा साठा आणि मुद्देमाल जप्त केला.

       सविस्तर वृत्त असे की, चकलांबा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी नारायण एक शिंगे हे स्टाफ सह पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पेट्रोलिंग करत असताना त्यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, राक्षस भवन फाटा ते राक्षस भवन जाणाऱ्या रस्त्यावरती एक इसम एका पत्रा शेडमध्ये देसी व विदेशी दारू विकत आहे तसेच कोळगाव ते तांदळा रोड वरती सार्थक बियर शॉपीच्या पाठीमागील बाजूस एक इसम दारूची अवैध विक्री करत आहे. त्याप्रमाणे सापळा रचून दोन्ही ठिकाणी वेगवेगळ्या वेळी धाड टाकली असता दोन्ही ठिकाणी बातमी प्रमाणे 21740 रुपये किमतीचा मुद्देमाल मिळाला असून तो जागीच जप्त करून आरोपीं 1) संदिपान सिताराम शेंबडे वय 38 वर्ष राहणार तांदळा तालुका गेवराई 2) राजेंद्र उर्फ नाना नाटकर राक्षसभवन तालुका गेवराई यास ताब्यात घेऊन कायदेशीर कारवाई करून दारूबंदी कायदा कलम 65( इ) प्रमाणे कायदेशीर पोलीस ठाणे चकलांबा येथे गुन्हा दाखल केलेला आहे.

 सदर कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर साहेब अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर साहेब, पोलीस उपाधीक्षक नीरज राजगुरू साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी नारायण एकशिंगे, पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर इंगळे, प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक कुमावत., पोलीस कॉन्स्टेबल खटाणे चालक हवालदार जमादार यांनी केली आहे

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow