अघोरी विद्या करणाऱ्या तीन भोंदू बाबांच्या चकलांबा पोलिसांनी आवळल्या मुसक्या

 0
अघोरी विद्या करणाऱ्या तीन भोंदू बाबांच्या चकलांबा पोलिसांनी आवळल्या मुसक्या

बीड प्रतिनिधी:-

 तीन मामांनी मिळून केला आपल्या भाचीवरच अघोरी विद्येचा प्रयोग, अघोरी विद्येचा प्रयोग पाहून गावकरी झाले भयभीत, पोलीस घटनास्थळी पोहोचताच सोडला गावकऱ्यांनी सुटकेचा श्वास

   दिनांक 9/9/2023 नऊच्या सुमारास मौजे पाथरवाला खुर्द येथे भुत उतरवण्यासाठी अमानुष कृत्य करुन जादूटोणा होत असलेबाबत चकलांबा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी नारायण एकशिंगे यांना मौजे बोरगाव येथील सरपंच संदीप जाधव यांनी फोनवरून कळविले की, आमच्या गावामध्ये एका वस्तीवर एका मुली वरती बंद खोलीमध्ये रात्रभर बाहेरगावचे काही लोक अघोरी विद्येचा प्रयोग करत असून ती मुलगी जोरजराने किंचाळत आहे तसेच अघोरी विद्या करणारे लोक हे मोठमोठ्याने आरडा ओरड करत आहे भूत अंगात आले बाबतच्या व देव अंगात आल्या बाबतच्या गोष्टी मोठ्याने करत आहेत अशी माहिती दिल्याने सदर गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेऊन आम्ही लागलीच पोलीस दूरक्षेत्र उमापूर येथील पोलीस हवालदार 16 74पवार pc 1288 रुईकर यांना सदर ठिकाणी तात्काळ पाठवून तेथून पिढीत मुलीची भोंदू बाबाच्या तावडीतून सुटका करून तिला औषध उपचाराची गरज असल्याने तात्काळ तिचे आईसोबत हॉस्पिटलमध्ये पाठवले व जादूटोना करणारे भोंदू बाबा इसम 1) संजय रावसाहेब नवगिरे 2) गणेश रावसाहेब नवगिरे 3) दिलीप रावसाहेब नवगिरे सर्व रा. मुंगी ता.शेवगाव यांना तब्यात घेऊन त्यांना दुरक्षेत्र येथे आणून त्यांचे विरुद्ध पीडित मुलीचे वडील फिर्यादी नामे एकनाथ दगडू खंडारे रा.पाथरवला यांच्या फिर्यादी वरून पोस्टे चकलंबा गु.र.न 258/2023 कलम 342.34 भा. द.वी सह कलम 3 महाराष्ट्र जादूटोणा प्रतिबंध अधिनियम 2013 प्रमाणे गुन्हा दाखल करून पुढील तपास पोह 16 74 पवार करित आहेत

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow

SUNIL JADHAV Journalist Sunil Jadhav, an exceptional reporter and journalist, has made a remarkable impact through his platform, ilovebeed.com. With his relentless dedication and deep-rooted love for the city of Beed, Jadhav has become a voice that resonates with the people, capturing the essence of this vibrant region.