रायमोहा परिसरात कृषी विभागाकडून पिकाची पाहणी

रायमोहा परिसरात कृषी विभागाकडून पिकाची पाहणी

रायमोहा (प्रतिनिधी) : शेतक-यांच्या संकट मालिका संपता संपत नाही एक मागे टाकले तर दुसरे उभा ठाकते बीड मतदार संघातील रायमोह शिवारात गोकुळ सानप यांनी सोयाबीन पिक पेरले मात्र उन्नीती नावाच्या अळीने या पिकाचा फडशा पाडला. जागेवरच सोयाबीनची झाडे जळून गेल्याने शेतकरी हताश झाला आहे ,कृषी कार्यालयाचे संजय फरताडे यांनी पहाणी केली .

आधीच पाऊस उशिरा आला तो देखील फारसा पुरेसा नव्हता मात्र पेरणी केली ,उगवणी झाली ,पावसाचे फुगारे येत गेले आणि सोयाबीन कसे बसे फुल शेंगा धारण करू लागले ,खत खुरपनीवर खर्च झाला मात्र आता हे पिक या रोगाला बळी पडत असल्याने शेतकरी सानप हताश झाले आहे .

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow