फॉर्म नंबर 17 भरण्यासाठी 30 सप्टेंबर पर्यंत मुदत वाढ
बीड( प्रतिनिधी) :अर्धवट राहिलेले अथवा काही कारणामुळे दहावी बारावीची परीक्षा देऊ न शिकलेल्या विद्यार्थ्यांना खाजगीरित्या 17 नंबरचा फॉर्म भरण्याची सुविधा सर्व मान्यता प्राप्त माध्यमिक उच्च माध्यमिक शाळेत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.या परीक्षेसाठी आतापर्यंत सुविधा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या संपर्क केंद्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अर्ज भरावा लागत होता .प्रचलित पद्धतीमध्ये अनेक अडचणींना शिक्षण मंडळाला सामोरे जावे लागत होते .बीड जिल्ह्यासाठी मिल्लिया
माध्यमिक विद्यालय हे एकमेव संपर्क केंद्र असल्यामुळे विद्यार्थ्यांना फॉर्म भरण्यास अडचणी येत होत्या. प्रचलित पद्धत बंद करून मान्यता प्राप्त माध्यमिक शाळा मधून 17 नंबरचा परीक्षा फॉर्म स्वीकारण्याची कार्यपद्धती मार्च 2024 च्या परीक्षेपासून सुरू करण्यात येत आहे अर्ज भरण्यासाठी किमान इयत्ता पाचवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, शाळा सोडल्याचा दाखला( मूळ प्रत) ,नसल्यास द्वितीय प्रत व प्रतिज्ञापत्र, आधार कार्ड ,स्वतःचा पासपोर्ट आकाराचा फोटो आवश्यक असून इयत्ता दहावी व बारावी खाजगी विद्यार्थ्यांना नोंदणी अर्ज ऑनलाईन स्वीकारण्याची तारीख 20 ते 30 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.यापूर्वी अर्ज करण्याची अंतिम दिनांक 11 सप्टेंबर 2023 पर्यंत मुदत होती.परंतु आता नियमित शुल्काने नाव नोंदणी अर्ज करण्यासाठी राज्य शिक्षण मंडळाने 30 सप्टेंबर 2023 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. इच्छुक दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या इच्छुक शाळेत शिक्षण महामंडळाच्या दिलेल्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरावयाचा आहे.अधिक माहितीसाठी शिक्षण महामंडळाच्या संकेतस्थळावर किंवा शाळेच्या मुख्याध्यापका कडे संपर्क साधावा व इच्छुक इयत्ता दहावी बारावी खाजगी बहिस्थ विद्यार्थ्यांनी 17 नंबरचा परीक्षा फॉर्म भरावा असे आवाहन करिअर कौन्सिलर डॉ.संजय तांदळे, बीड यांनी केले आहे.
What's Your Reaction?