मातंग समाजाला निवडणुकीत प्रतिनिधित्व देण्याची मागणी
मातंग समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणात संघटन व निवडणुकीत प्रतिनिधित्व द्या-
- काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्याकडे मातंग समाजाची मागणी.
मुंबई, दि. १६ फेब्रुवारी
मातंग समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणात पक्ष संघटन, लोकसभा, विधानसभा व विधान परिषदमध्ये प्रतिनिधित्व देण्यात यावे ही मागणी करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या राज्यातील मातंग समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रभारी रमेश चेन्निथला यांची लोणावळा येथे भेट घेऊन आपल्या मागण्यांचे निवदेन त्यांना सादर केले अशी माहिती मातंग समाजाचे नेते व महारष्ट्र प्रदेश काँगेस कमिटीचे प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस यांनी दिली.
शिष्टमंडळात माजी गृह राज्यमंत्री रामेश बागवे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष विजय अंभोरे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस, मुंबई प्रदेश काँग्रेसचे सचिव विकास तांबे, अकोला महानगर पालिकेचे माजी नगरसेवक पराग कांबळे, अनुसूचित जाती विशेष कृती दलाचे सदस्य सचिव संजय वानखडे, ठाणे जिल्हा युवक काँग्रेसचे सरचिटणीस रवि जाधव, अमरावती जिल्हा अनुसूचित जाति विभाग कार्याध्यक्ष सागर कलाने, बीड जिल्हा अनुसूचित जाति जिल्हा कार्याध्यक्ष दत्ता कांबळे आदी सहभागी झाले होते.
What's Your Reaction?