संत मुक्ताबाईच्या पालखीतील वारकऱ्यांना व्यापाऱ्यांकडून भोजनदान

संत मुक्ताबाईच्या पालखीतील वारकऱ्यांना व्यापाऱ्यांकडून भोजनदान

बीड प्रतिनिधी :-बीड शहरात श्री संत मुक्ताबाई यांची पालखी माळीवेस चौकातील श्री. हनुमान मंदिर या ठिकाणी मुक्कामास आली असता,माळीवेस चौक येथील व्यापारी संघटने कडुन संत मुक्ताबाई पालखीच्या वारकऱ्यांची सेवा भोजनदान करुन करण्यात आली .

दरवर्षी एदलाबाद येथून श्री.संत मुक्ताबाई संस्थान कडुन महान संत असणाऱ्या संत मुक्ताबाई यांची पालखी निघते आणी आषाढी वारी साठी पंढरपूर या ठिकाणी पोहचते. या पालखीत हजारो भाविक पायदळी या पालखी सोहळयात पंढरपुरच्या विठु रायाचे दर्शन घेण्यासाठी जातात.हि पालखी बीड शहरात मोठ्या दिमाखात प्रवेश करते आणी बीडकर हर्षौउल्हासात संत मुक्ताई पालखीचे स्वागत करतात. बीड शहरातील विविध भागातून हि पालखी बीडच्या मध्यस्थानी असणार्या माळीवेस चौकातील श्री. हनुमान मंदीरात मुक्कामी असते. गेली अनेक दशकांपासून या पालखीचे आगमन बीड शहरात होते. या पालखीतील भाविक भक्तांसाठी बीड नगरी नटलेली असतेच परंतु त्यांची मनोभावे सेवा करण्यासाठी बीडकर उत्साही असतात. या पालखीतील वारकऱ्यांना विविध ठिकाणी राहण्याची आणी भोजनाची व्यवस्था अनेक मंडळ,सेवा भावी संस्था, राजकीय मंडळी,व्यापारी वर्ग करत आसतो. संत मुक्ताबाई यांची पालखी ज्या माळीवेस चौकात मुक्कामाला असते त्या माळीवेस चौकातील व्यापारी वर्ग या वारकऱ्यांची सेवा निरंतर करत आलेला आहे. कालच्या पालखी सोहळयासाठी अन्नदान करुन व्यापारी संघटनेने या वारकऱ्यांची सेवा केली. दरवर्षी आगमण होणाऱ्या या पालखी सोहळयातील वारकऱ्यांसाठी माळीवेस येथील व्यापारी तत्पर असतात. यंदाच्या अन्नदान सेवेसाठी बाबुलाल जोया.किरण शिंगण,विलास बावणे,गोटु दोडके, विसावा पान सेंटर, अनिल सेल्स अँन्ड सर्विस, बाळासाहेब चहा सेंटर, अमोल आमटे,महादेव सवाई यांनी या वारकऱ्यांची मनोभावे सेवा घडण्यासाठी परिश्रम घेतले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow