कन्हेरवाडी शिवारात हॉटेलवर गोळीबार

कन्हेरवाडी शिवारात हॉटेलवर गोळीबार

परळी अंबाजोगाई रोडवर कन्हेरवाडी शिवारात यशराज हॉटेलवर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गोळीबार करणाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिगारेटचे पाकीट महाग दिल्याच्या कारणावरून सदर वाद झाला होता.

बीड जिल्ह्यातील परळी शहरापासून जवळच असलेल्या परळी अंबाजोगाई रोडवर कन्हेरवाडी शिवारामध्ये, विलास आघाव यांच्या हॉटेल यशराज येथे, हॉटेलमधील एका नोकराला ग्राहकाने रात्रीच्या दरम्यान सिगारेटचे पाकीट मागितले. सदर पाकीट महाग का दिले यावरून ग्राहक आणि हॉटेलमधील नोकरांमध्ये वाद सुरू झाला. त्यानंतर या वादातून ग्राहकाने स्वतःकडील पिस्तूल काढली, आणि हवेत गोळीबार केला. एवढ्यात प्रसंगावधान साधून तेथील नागरिकांनी शटर लावून घेतले. एवढेही न थांबता त्या ग्राहकाने शटरवर पुन्हा दोन गोळ्या झाडल्या.यानंतर नागरिकांनी याची माहिती पोलिसांना दिली त्यानंतर आघाव यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चौघा जणांच्या विरोधात कलम 307 323 504 506 34 भादविसह कलम 3/ 25 सहकलम आर्म अॅक्ट प्रमाणे परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याचा पुढील तपास परळी ग्रामीण पोलीस करत आहेत.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow