बीड लोकसभा निवडणूक पाचव्या दिवशी पाच अपक्ष उमेदवारांचे अर्ज दाखल

बीड लोकसभा निवडणूक पाचव्या दिवशी पाच अपक्ष उमेदवारांचे अर्ज दाखल

बीड प्रतिनिधी: 39 बीड लोकसभा मतदारसंघामध्ये आज पाचव्या दिवशी पाच नामनिर्देशन पत्र दाखल झाली असून हे सर्व अपक्ष उमेदवार आहेत.

 39 बीड लोकसभा मतदारसंघातून आज 5 अपक्ष उमेदवारांनी अर्ज दाखल केले. यामध्ये शेख याशेद शेख तय्यब, वचिष्ट उद्धव कुटे, राजेंद्र अच्युतराव होके आणि शितल शिवाजी धोंडरे यांनी दोन अर्ज सादर केले. असे एकूण पाच नामनिर्देशन अर्ज जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्या समक्ष सादर केले आहेत. आज पर्यंत एकूण 108 इच्छुक उमेदवारांना 246 नामनिर्देशन पत्रांचे वाटप करण्यात आले आहे. 39 बीड लोकसभा मतदारसंघासाठी दि. 18 एप्रिल 2024 रोजी अधिसूचना जारी करण्यात आली असून 25 एप्रिल 2024 ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. तर 26 एप्रिल2024 रोजी उमेदवारी अर्जांची छानणी करण्यात येणार आहे. 29 एप्रिल 2024 ही अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. सोमवार दि. 13 मे 2024 रोजी मतदान होणार आहे. तर 4 जून रोजी मतमोजणी केली जाईल. निवडणूक आदर्श आचारसंहिता 6 जूनपर्यंत राहील.          

  आतापर्यंत सादर केलेले नामनिर्देशन अर्ज

अपक्ष उमेदवार- शेख तौसिफ अब्दुल सत्तार, सादिक इब्राहिम शेख, उदयभान नवनाथ राठोड, शेख एजाज शेख उमर, भास्कर किसन शिंदे, तुकाराम विठोबा उगले, शेख याशेद शेख तय्यब, वचिष्ट उद्धव कुटे, राजेंद्र अच्युतराव ठोके व शितल शिवाजी धोंडरे (दोन अर्ज) .भारतीय जवान किसान पार्टी (इंडिया) पक्षाकडून अंकुश रामा खोटे यांनी अर्ज दाखल केला. नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाकडून बजरंग मनोहर सोनवणे यांनी दोन अर्ज तर सारिका बजरंग सोनवणे यांनी एक अर्ज दाखल केला.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow