माजी नगरसेवक विटकर अमोल अहिरे यांच्याकडून दिंडीतील भक्तांना भोजन व्यवस्था

माजी नगरसेवक विटकर अमोल अहिरे यांच्याकडून दिंडीतील भक्तांना भोजन व्यवस्था

बीड:प्रतिनिधी- शहरातील बार्शी नाका येथे माजी नगरसेवक लक्ष्मण विटकर आणि सामाजिक कार्यकर्ते अमोल अहिरे यांच्याकडून प्रतिवर्षा प्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात पायी दिंडी जाणाऱ्या भक्तांना भोजन व्यवस्था करण्यात आली.

सध्या पंढरपूरच्या दिशेने विठुरायाच्या दर्शनासाठी ओढ असणाऱ्या भक्तांच्या दिंड्या जात आहेत. छोट्या-मोठ्या अनेक दिंड्या बीड शहरातून प्रस्थान करत आहेत. बीड शहरातून प्रवेश होताच बार्शी नाक्यावर आल्या की, त्यांच्यासाठी बार्शी नाक्यावर या दोन अहवालियांकडून भोजन व्यवस्था करण्यात येते. यामध्ये हजारो भावीक भक्त दिवसभरात त्रप्त होतात. काही दिंड्यांसाठी तर मुक्कामाची ही व्यवस्था आणि जेवणाची व्यवस्था करण्यात येते. प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी आवर्जून भाविक आणि दिंड्या येथील भोजनाचा आस्वाद घेऊनच पुढे जातात. या प्रसंगी ‌‌ या भोजन उपक्रमाचे श्री गोरक्षनाथ टेकडीचे महंत ह भ प गुरुवर्य शांतीब्रह्म नवनाथ बाबा महाराज तसे रवी गिरी महाराज अहेर वडगाव यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आला आहे. ही भोजन व्यवस्था दररोज नित्यनेमाने येणाऱ्या जाणाऱ्या दिंड्यांसाठी या महिन्यात आयोजित केली जाते कार्यक्रमाचे व्यवस्थापक नगरसेवक लक्ष्मण आण्णा विटकर अमोल अहिरे व बार्शी नाका मित्र मंडळ व आरडी मित्र मंडळ. यांच्यावतीने करण्यात येते. सदर उपक्रमाचे बीड जिल्ह्यातून कौतुक केले जात आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow