वरवटी येथे वनरक्षकास मारहाण
बीड प्रतिनिधी: - बीड तालुक्यातील वन विभागात वरवटी येथे वनरक्षकास मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये दोघाजणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वनविभागातील वनरक्षक किसन वैजिनाथ जगताप हे भाळवणी कार्यक्षेत्रात कार्यरत असून दि. १९ सप्टेंबर रोजी बीड तालुक्यातील मौजे वरवटी येथील वनविभागाच्या सर्वे नं. ३६३ कंपार्डमेट नं. ३७९ येथे लावलेल्या झाडांची देखभाल करण्यासाठी गेले होते. त्याठिकाणी त्यांना काही म्हशी चरतांना दिसल्या त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी ते स्थळ पंचनामा करू लागले. सचिन गोडींबा बहिरवाळ, विभिषण गोडींबा बहिरवाळ या दोघांनी शासकीय कामात अडथळा निर्माण केला त्याचबरोबर वनरक्षक जगताप यांच्यासह अन्य एकाला चापटाने व लोखंडी पाईपने मारहाण केली व शिवीगाळ करून जिवे मारण्याच्या धमक्याही दिल्या या प्रकरणी सचिन गोडींबा बहिरवाळ आणि विभीषण गोडींबा बहिरवाळ रा. मांडवजाळी ता.बीड या दोघांविरूध्द बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून याचा पुढील तपास पोलीस करत आहेत
What's Your Reaction?