माजी आमदार भीमराव धोंडे स्व.मुंडे साहेबांच्या समाधीस्थळी नतमस्तक
आष्टी प्रतिनिधी: महाराष्ट्राचे लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या परळी तालुक्यातील पांगरी येथील गोपीनाथ गडाला भेट देऊन आष्टी पाटोदा शिरूर विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार माजी आमदार भीमराव धोंडे यांनी त्यांच्या समाधी स्थळावर पुष्पहार अर्पण करून दर्शन घेतले.
याबाबत अधिक माहिती अशी की, गोपीनाथगड हे महाराष्ट्र राज्याचे प्रेरणास्थान आहे. राज्यात त्यांचे आजही लाखों चाहते आहेत. त्यांच्या समाधीस्थळाच्या दर्शनाने उर्जा आणि प्रेरणा मिळते. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि नंतर केंद्रीय मंत्री झाले होते. केंद्रात मंत्री झाल्यानंतर काही दिवसांनी त्यांच्यावर काळाने घाला घातला. पुढच्या पिढीला त्यांची कायम आठवण रहावी म्हणून पांगरी येथे त्यांचा भव्य पुतळा उभारण्यात आला आहे. त्या ठिकाणाला गोपीनाथ गड असे नाव देण्यात आले आहे.
त्यांच्या राजकीय जिवनात त्यांनी कधीही जात पात न मानता सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन राजकारण करीत अनेक आमदार - खासदार घडविले. ते आपल्या भाषणात नेहमी सांगायचे की,मी उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही. मी थकणार नाही,मी रुकणार नाही, कोणासमोर कधीही झुकणार नाही. याच त्यांच्या महत्वपूर्ण शब्दांची प्रेरणा घेऊन बीड जिल्ह्यातील अनेकजण राजकारणात यशस्वी झालेले आहेत. गुरुवारी आष्टी पाटोदा शिरूर विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार व माजी आमदार भीमराव धोंडे यांनी त्यांचे परम मित्र असलेले लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या समाधीस्थळी पुष्पहार अर्पण करून दर्शन घेतले. तसेच स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या फोटो शेजारी ऊभे राहून आपले चिन्ह असलेले " शिट्टी " वाजवून आशिर्वाद घेतले. याप्रसंगी जि. प. सदस्य रामदास बडे, माजी सरपंच बाळासाहेब पवार, माऊली पानसंबळ व इतरांची उपस्थिती होती.
What's Your Reaction?