आज बाभळीच्या झाडावर वीज पडल्याने शेळ्यांचा मृत्यू

आज बाभळीच्या झाडावर वीज पडल्याने शेळ्यांचा मृत्यू

केज प्रतिनिधी :- आज पावसात विजेचा धक्का लागल्याने, बाभळीच्या झाडाखाली उभ्या राहिलेल्या शेळ्यांपैकी एका शेळीचा जागीच मृत्यू तर, अन्य शेळ्या गंभीर जखमी झाल्याची घटना केज तालुक्यातील आडस येथे घडली आहे.

गेल्या तीन दिवसापासून बीड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी, मेघगर्जनेसह तर काही भागात पाऊस हजेरी लावत आहे. अशाच पावसाच्या परिस्थितीत, बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील आडस या गावी, आज दुपारी विजांचा कडकडाट झाला. आणि पाऊस सुरू असताना, शेतकरी वैजनाथ दगडू आप्पा आकुसकर यांच्या मालकीच्या शेळ्या, पावसामुळे बाभळीच्या झाडाखाली जाऊन उभे राहिल्या. तेव्हा अचानक वीज बाभळीच्या झाडावर पडल्याने, त्या विजेच्या धक्क्यात एका शेळीचा जागीच मृत्यू झाला. व अन्य शेळ्याही गंभीर जखमी झाल्या असून , त्या अन्य शेळ्यांची ही प्रकृती चिंताजनक असल्याचे शेतकऱ्याने सांगितले. यामध्ये शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले असून, प्रशासनाकडून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली जात आहे. 

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow