श्रीक्षेत्र भगवानगडावर गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी
श्री क्षेत्र भगवानगड येथे हजारो भाविकांच्या उपस्थितीमध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त पारंपारिक पद्धतीने गुरुपूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला.
दरवर्षी आषाढी एकादशीनिमीत्त पंढरपूरला गेलेली भगवानगडाची पालखी गडावर पोहोचल्यानंतर गुरुपौर्णिमेच्या दिवशी "काला" केला जातो. गडाचे मठाधिपती, ह.भ.प.न्यायाचार्य डॉ.श्री.नामदेव महाराज शास्त्री बाबांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूरवरून श्री क्षेत्र भगवानगडाच्या पालखीसोबत परतलेले वारकरी तसेच भगवानगडाचा भक्तवर्ग यांच्या उपस्थितीत हा काल्याचा सोहळा साजरा करण्यात आला. योगायोगाने पालखीच्या काल्याच्या दिवशी गुरुपौर्णिमा येत असल्याने हा एक दुग्धशर्करा योग बनतो. सदरील कार्यक्रम साजरा करताना ह.भ.प.न्यायाचार्य डॉ.श्री.नामदेव महाराज शास्त्री बाबांच्या मार्गदर्शनाखाली गडावरील प्रधान आचार्य ह.भ.प.श्री.नारायण महाराज शास्त्री (स्वामीजी) यांनी गडावरील विजयी श्री.पांडुरंगाचा अभिषेक करून वै.गुरुवर्य श्री संत भगवानबाबा, वै.गुरुवर्य श्री संत भीमसिंह महाराज यांच्या समाधीचा अभिषेक व महापूजा केली. त्यांनतर सर्व भाविकांनी श्री क्षेत्र भगवानगडाचे मठाधिपती, ह.भ.प.न्यायाचार्य डॉ.श्री.नामदेव महाराज शास्त्री बाबांना पुष्पहार घालून आपल्या श्रीगुरुंचे यथोचित गुरुपूजन केले. श्रीगुरुंचे पूजन करण्यासाठी ह.भ.प.महंत श्री.विवेकानंद महाराज शास्त्री, ह.भ.प.महंत श्री.कृष्णा महाराज शास्त्री, ह.भ.प.महंत श्री.नवनाथ महाराज शास्त्री, ह.भ.प.महंत श्री.हनुमंत महाराज शास्त्री, ह.भ.प.महंत श्री.अतुल महाराज शास्त्री यांच्यासह गडाचे शेकडो विद्यार्थी व हजारो भाविकांची उपस्थिती होती. उपस्थित भाविकांना उद्धवशेठ वाघ राणेगाव, गहिनीनाथ बांगर तरडगव्हान, शहादेव ढाकणे ढोकवडगाव यांनी महाप्रसादाची पंगत दिली. दिवसभर श्रीगुरुंच्या दर्शनासाठी भाविकांची रीघ सुरूच होती.
What's Your Reaction?