करचुंडी येथे हजरत मकतुम भावदिन उरूस यात्रा उत्सव

करचुंडी येथे हजरत मकतुम भावदिन उरूस यात्रा उत्सव

बीड(प्रतिनिधी) मौजे करचुंडी ता.जि. बीड येथे प्रतिवर्षीप्रमाणे हजरत मकतुम भावदिन साहब उरूस (यात्रा उत्सव) मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येणार आहे. या गावातील सर्व जाती-धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहत आहेत. या गावच्या पूर्वेला व पश्चिमेला नदी आहे या दोन्ही नद्यांच्या मध्यभागी गावची मांडणी झालेली आहे. ज्या ठिकाणी या नद्या येऊन मिळतात त्या संगमाच्या तीरावरती हजरत मकतुम भावदिन पिराचे सुंदर असे दर्गा आहे. हा पिर सर्व जाती धर्मातील लोकांच्या नवसाला पावणार आहे. या ठिकाणी दर्शनासाठी सबंध महाराष्ट्रातून लोक येत असतात, कारण या पिराची आख्यायिका फार मोठी आहे.

यात्रा उत्सवातील कार्यक्रम पुढील प्रमाणे:- दिनांक २२ मे रोजी रात्री ठीक ८ वाजता संदल मिरवणूक मोठ्या उत्साहात निघणार आहे. दिनांक २३ मे रोजी रात्री ठीक ८ वाजून 30 मिनिटांनी महिला व पुरुषांसाठी संगीत रजनीचा कार्यक्रम होणार आहे. तसेच २४ मे रोजी दुपारी ३.३० ते ५ या वेळेमध्ये कुस्त्यांची दंगल आयोजित केली आहे. तरी पंचक्रोशीतील भाविक भक्त व छोट्या मोठ्या व्यवसायिक व पैलवानांनी याची नोंद घ्यावी असे करचुंडी गाव यात्रा कमिटीच्या वतीने कळविण्यात येत आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow