अर्ष खुर्शीद आलमचा सन्मान

अर्ष खुर्शीद आलमचा सन्मान

 शहरातील जमजम कालोनी मध्ये असलेल्या सर सैयद अहेमदखान उर्दू शाळा मधील विद्यार्थी अर्श खुर्शीद आलम ह्या मुलांने नुकत्याच झालेल्या दहावी परिक्षेत ८३,२०.% गुण घेऊन सर सैयद अहेमदखान शाळेततील ओबीसी प्रवर्गामधुन प्रथम क्रमांक पटकावला आहे, अर्श खुर्शिद आलम हे ओबीसी बाॅईज मध्ये प्रथम आल्याबद्दल ऑल इंडिया मुस्लीम ऑर्गनायझेशन चे राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर अहमद अन्सारी यांनी अर्श खुर्शीद आलम यांचा सत्कार केले आहे,

अर्श आलम हे बीड नगरपरिषदेचे माजी सभापती खुर्शीद आलम यांचे चिरंजीव आहेत, ऑल इंडिया मुस्लीम ऑर्गनायझेशन चे राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर अहमद अन्सारी हे संघटनेच्या कामानिमित महाराष्ट्र सह देशभरात दौ-यावर असतात, ते आज बीड जिल्ह्याच्या दौ-यावर आले होते, सदर कार्यक्रमाचे आयोजन बीड जिल्हा ओबीसी संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष प्रा.रफीक बागवान यांनी केले होते, यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून ओबीसी संघटनेचे इरफान सेठ कुरेशी, शहराध्यक्ष अब्दुल खालेद,छप्पर संघटनेचे जिल्हाध्यक्ष जाकेर भाई, शफिक सेठ तांबोळी, मोहम्मद सुवेज,मोमीन अझहर भाई,शहेबाज बाॅस,अरहम सौदागर सह इतर उपस्थित होते,

सर्व बातमी आत्ता एकाच क्लिक वर Download अँप 

Files

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow