राष्ट्रवादी महिलांच्या वतीने मुख्याधिकारी यांचा सन्मान

राष्ट्रवादी महिलांच्या वतीने मुख्याधिकारी यांचा सन्मान
मुख्याधिकारी अंधारे यांचा सन्मान करताना राष्ट्रवादीच्या महिला

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिलांच्या वतीने सुप्रिया सन्मान या उपक्रमांतर्गत नगरपालिकेच्या मुख्याधिकारी नीता अंधारे यांचा सन्मान करण्यात आला.

बीड शहर राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या वतीने बीड नगरपरिषदच्या कर्तबगार मुख्याधिकारी नीता अंधारे यांचा संसद रत्न सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त सुप्रिया सन्मान या उपक्रमांतर्गत सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजक रेहाना अनिस पठाण (राष्ट्रवादी काँग्रेस बीड शहराध्यक्ष) यांनी केले होते. यावेळी त्यांच्या समवेत अनिता वाघमारे(जिल्हा कार्याध्यक्ष) कमल निंबाळकर (प्रदेशउपाध्यक्ष ) मीना देवकते (ओबीसी प्रदेश सचिव) आदींची उपस्थिती होती.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow