भंडारा उधळून आरक्षण मिळत नसेल तर राज्यकर्त्यांना काळेफासू !दत्ता वाकसे

 0
भंडारा उधळून आरक्षण मिळत नसेल तर राज्यकर्त्यांना काळेफासू !दत्ता वाकसे

बीड/प्रतिनिधी  धनगर समाजाला राज्यघटनेत आरक्षणाची तरतूद असतानाही गेल्या ७० वर्षांपासून धनगर बांधव आरक्षणासाठी टाहो फोडत आहेत. त्यामुळेच आज माझ्या धनगर बांधवाने सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अंगावर भंडारा उधळून आरक्षणाची मागणी केली. मात्र, आम्ही एक्क्यावरच थांबणार नाहीत. धनगर आरक्षणाचा वटहुकूम काढला नाही तर राज्यकत्यांच्या तोंडाला काळे फासू, असा शेफर्ड इंडिया इंटरनॅशनल संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे व्हॉइस प्रेसिडेंट दत्ता वाकसे यांनी दिला. संसदेच्या विशेष अधिवेशनात महाराष्ट्रातील धनगर समाजाला अनुसूचित जमाती (एसटी प्रवर्ग) आरक्षणासाठीचा वटहुकूम काढण्याच्या मागणीसाठी यशवंत सेनेच्या वतीने गेल्या तीन दिवसांपासून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मगावी चौंडी येथील स्मारकस्थळी यशवंत सेनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अण्णासाहेब रूपनवर, सरचिटणीस सुरेश बंडगर हे उपोषण करत आहेत. मंत्री विखे यांच्या अंगावर भंडारा उधळून आरक्षणाची मागणी केल्याने धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांस अमानुषपणे मारहाण केली. त्याचा निषेध करीत असल्याचे सांगून वाकसे म्हणाले की, चौंडी येथे उपोषणास बसलेल्या आंदोलकांची प्रकृती खालावत जात त्यामुळे तात्काळ दिल्लीत या होत असलेल्या विशेष अधिवेशनामध्ये धनगर समाजाच्या एसटी अनुसूचित जमातीच्या आरक्षणाचा वटहुकूम काढण्यात यावा आणि जर का तो काढला नाही तर उपोषण करते ठाम आहेत की आम्हाला मरण आले तरी चालेल परंतु शरण जाणार नाही गेल्या अनेक वर्षापासून धनगर समाजाला एसटी अनुसूचित जमातीच्या आरक्षणाच्या प्रश्नासंदर्भात चाल ढकल केली जात असून त्यामुळे आमच्या समाजातील गोरगरीब कष्टकरी मेंढपाळ यांच्या मुलांना देशधडीला लावण्याचे काम सरकार करत आहे आम्हाला भारतीय राज्यघटनेमध्ये भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेमध्ये पृष्ठ क्रमांक 36 वर धनगर ओरान असं समाविष्ट केलेला आहे आम्हाला फक्त राज्य सरकारने केंद्र सरकारला पत्र पाठवून आमच्या हक्काचे एसटी अनुसूचित जमातीचे आरक्षण वटहुकूम तात्काळ काढावा असे न केल्यास आगामी काळात राज्यांमध्ये धनगर समाजाला रस्त्या उतरावे लागेल आणि त्याचे परिणाम सरकारला भोगावे लागतील त्यामुळे विशेष अधिवेशनामध्ये तात्काळ वटहुकूम काढण्यात यावा असे देखील मागणी वाकसे यांनी त्या ठिकाणी समाजाला संबोधित करताना व्यक्त केली

झोपलेले राज्य सरकार कधी जागे होणार ?  आतापर्यंत प्रशासनाचा एकही अधिकारी आमच्याकडे फिरकला नाही. पालकमंत्री व राज्यकर्तेही आले नाहीत. आम्ही मेलो तरी येथून हलणार नाही. धनगर आरक्षणाबाबत प्रत्येक सरकारने आमची फसवणूक केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदिवासींना आहे ते आरक्षण धनगर समाजाला देण्याचे आश्वासन दिले, पण अजून धनगर समाजाच्या पदरात काहीच पडलेले नाही. आरक्षणासाठी आमचा प्राण गेला तरी समाज चौंडी येथून उठणार नसल्याचे वाकसे म्हणाले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow

SUNIL JADHAV Journalist Sunil Jadhav, an exceptional reporter and journalist, has made a remarkable impact through his platform, ilovebeed.com. With his relentless dedication and deep-rooted love for the city of Beed, Jadhav has become a voice that resonates with the people, capturing the essence of this vibrant region.