ज्ञानसागर गुरुकुल मध्ये झुणका भाकर स्पर्धा संपन्न
(बीड प्रतिनिधी ) : मातृभूमी प्रतिष्ठान व ज्ञानसागर गुरुकुल च्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून 7 मार्च 2024 रोजी पूर्वसंध्येला ज्ञानसागर गुरुकुल येथे मुलांमध्ये समानतेचे मूल्य रुजवण्यासाठी झुणका भाकर करण्याची स्पर्धा सौ .स्वाती सानप यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती .गुरुकुलच्या बहुसंख्य विद्यार्थ्यांनी झुणका भाकर बनवण्यामध्ये सहभाग नोंदवाला व उत्कृष्ट झुणका भाकरी करणाऱ्या तीन विद्यार्थ्यांना सन्मानपत्र व पारितोषिक देण्यात आली .यावेळी गणेश सानप ,डॉ .संजय तांदळे, दिनकर सानप सह गुरुकुलचे विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
What's Your Reaction?