अज्ञात वाहनाच्या धडकेत काळविंट गंभीर जखमी

अज्ञात वाहनाच्या धडकेत काळविंट गंभीर जखमी

बीड प्रतिनिधी: मांजरसुंबा पाटोदा महामार्गावर संगीत शाळेजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत काळवीट गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. तात्काळ नागरिकांनी पाणी पाजून उपचारासाठी रवाना केले.

मांजरसुंभा ते पाटोदा राष्ट्रीय महामार्गावर संगीत शाळेजवळ अज्ञात चारचाकी वाहनांच्या धडकेत, एक काळवीट रस्ता क्रॉस करत असताना, गंभीर जखमी झाले. यावेळी तात्काळ घटनास्थळी नागरिकांची गर्दी जमली होती. यावेळी विक्रांत वाणी सामाजिक कार्यकर्ते गणेश ढवळे यांच्या सह नागरिकांनी पोलीस व वन विभागाला याची माहिती दिली. यावेळी घटनास्थळी पोलीस कर्मचारी संतोष राऊत, डोंगरे यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी त्या काळविटाचे एक शिंग तुटुन पडलेले आणि एक पाय मोडलेल्या अवस्थेत होते तात्काळ नागरिकांनी त्या काळवीटाला पाणी पाजले. तोपर्यंत वनकर्मचारी आनिल शेळके घटनास्थळी दाखल झाले. वन विभागाची गाडी लवकर न आल्याने तात्काळ नागरिकांनी उपचारासाठी स्कॉर्पिओ मध्ये पोहोच केले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow