एम आय एम जिल्हाध्यक्ष शफिक भाऊंची तेलंगणात हवा

एम आय एम जिल्हाध्यक्ष शफिक भाऊंची तेलंगणात हवा

बीड (प्रतिनिधी) पाच राज्यांच्या निवडणुकीचा निकाल येत्या 3 डिसेंबर रोजी लागणार आहे, मिनी लोकसभेसाठी लोकांचा कौल कोणाकडे याकडे अवघ्या देशांचे लक्ष लागलेले आहे. यात प्रामुख्याने महाराष्ट्राच्या सीमेला लागुन असलेल्या तेलंगाणा राज्याच्या निवडणुकीकडे जास्त लक्ष लागलेले आहे. कारण याच राज्यातील दोन पक्ष महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळे वळण देत आहेत. यात प्रामुख्याने बीआरएस आणि एमआयएम. या दोन्ही पक्षांमुळे महाराष्ट्रातील स्थानिक पक्ष चिंताग्रस्त झालेले आहेत. मुस्लिम समाजाचा आतापर्यंत ज्या पक्षांनी केवळ वोटबँक म्हणून वापर केला या पक्षातील नेत्यांना नेहमीच दुय्यम वागणुक मिळाली अशा नेत्यांना एमआयएमच्या रूपाने एक हक्काचे व्यासपीठ उभारले आहे. यामध्ये बीड जिल्ह्यात एमआयएम पक्षाने आपली पाळेमुळे चांगलीच रोवली असुन विद्यमान जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.शेख शफिक भाऊ यांच्या झंझावती आणि संघटन कौशल्यामुळे एमआयएम बीड जिल्हयात सुस्थितीत आहे. अ‍ॅड.शेख शफिक भाऊ यांनी युवकांची प्रचंड मोठी फळी उभारली असुन या माध्यमातुन सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रात कार्य करणे निरंतरपणे चालु आहे. आपल्याकडे असलेल्या अफाट भाषण कौशल्य आणि मराठी, हिंदी भाषेवर असलेले प्रभुत्व त्यांनी वेळोवेळी सिध्द केले आहे. याचाच फायदा त्यांना होतांना दिसत आहे. आपल्या भाषण कौशल्याच्या जोरावर हजारोंच्या जनसमुदायाला आपलेसे करण्याची ताकद भाऊमध्ये आहे.

याबाबत असे की, आपल्या भाषण कौशल्याची छाप जवळपास महाराष्ट्रात अ‍ॅड.शेख शफिक भाऊंनी निर्माण केली आहे. याचाच कौल म्हणावे की, काय त्यांना तेलंगाणामध्ये विधानसभा निवडणुकीसाठी एमआयएम पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचाराला महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष खा.इम्तियाज जलील, कार्याध्यक्ष-गफ्फार कादरी, मराठवाडा अध्यक्ष फराज लाला, प्रदेश उपाध्यक्ष-सय्यद मोईन यांच्या सुचनेवरून बोलावणे आले. भाऊंकडे असलेल्या भाषण कौशल्याची भुरळ एमआयएम पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष बॅरिस्टर खा.असदोद्दीन ओवेसी, अकबर ओवेसी यांच्यावर देखील आहे. अ‍ॅड.शेख शफिक भाऊंनी आपल्या पक्षाचे तेलंगाणा(हैदराबाद) राज्यातील जुबली हिल्स येथील एमआयएमचे उमेदवार मोहम्मद राशेद फराज यांच्या प्रचारार्थ सभा घेतल्या, मतदारांच्या भेटी गाठी घेवून उमेदवार कसा योग्य आहे हे पटवुन दिले, कॉर्नर बैठकांना उपिस्थिती दर्शवली, महत्वाच्या बैठका घेतल्या, प्रचार रॅली, रोड शो, सभेत हिरारीने सहभाग घेतला. तब्बल पाच दिवस आपल्या पक्षाचा उमेदवार विजयी व्हावा यासाठी अहोरात्र मेहनत करून पक्ष वाढीसाठी झटणारा नेता म्हणून महाराष्ट्रातच नव्हे तर तेलंगाणात देखील आपली छाप पाडली. आज तेलंगाणात निवडणुका होत आहेत तर याचा निकाल येत्या 3 डिसेंबर रोजी लागणार आहे. निकाल काहीही लागो पण अ‍ॅड.शेख शफिक भाऊंची पक्षाबाबत असलेली तळमळ आणि पक्षनिष्ठेचा निकाल आजच लागला हे मात्र निश्चीत!

एमआयएम पक्षप्रमुख खा.ओवैसीकडून मिळाली कौतुकाची थाप

महाराष्ट्रातील विविध निवडणुकीत बुलंद आवाजाने सभा गाजवणाऱ्या एडवोकेट शेख शफीक भाऊ यांना प्रचारकरिता पक्षप्रमुखांनी तेलंगणातील निवडणुकांसाठी बोलाविले यातच भाऊंच्या कार्याची पावती मिळाली. संघटन कौशल्याच्या जोरावर केवळ स्थानिकच नव्हे तर राज्याचे देखील नेतृत्व करण्याची धमक त्यांच्यात असल्याचे दिसून येते समाजातील वंचित घटकांसाठी निस्वार्थपणे काम करीत राहणे यातच त्यांच्या मनाचा मोठेपणा दिसून येतो.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow