नगरपालिका कर्मचाऱ्यांनी पाणीपुरवठा संदर्भात प्रभाग 12 मध्ये नागरिकांशी संवाद साधला

नगरपालिका कर्मचाऱ्यांनी पाणीपुरवठा संदर्भात प्रभाग 12 मध्ये नागरिकांशी संवाद साधला

बीड प्रतिनिधी:-  बीड शहरातील प्रभाग क्रमांक 11 मध्ये पाणीपुरवठ्याच्या अनेक समस्या असताना नागरिकांच्या तक्रारीनंतर नगरपालिका अधिकारी कर्मचाऱ्यांनी त्या भागात जाऊन आज पाहणी करत नागरिकांशी संवाद साधला व त्यांच्या अनेक समस्या जाणून घेतल्या.

 आज प्रभाग क्रमांक 12 मध्ये,बीड नगरपालिकेतील पाणीपुरवठा विभागातील शेरकर, व अमृत योजनेचे किरण यांना रोशन पुरा भागात पाणी गेल्या 4 महिन्या पासून येत नसल्याने, नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या. तात लवकरात लवकर समस्या सोडवण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केली होती. जर मागणीकडे लक्ष दिले नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल. असा इशारा काँग्रेस निराधार निराश्रीत व्यक्ती विभागाचे बीड जिल्हा अध्यक्ष शेख मोहसीन नेतृत्वात नागरिकांनी दिला यावेळी कर्मचाऱ्यांनी येऊन पाहणी केली. आणि त्या भागातील नागरिकांशी संवाद साधला व त्यांचे अनेक समस्या जाणून घेतल्या.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow