पुणे : ई-वाहनांच्या चार्जिंगची चिंता नाही

पुणे : पुढारी वृत्तसेवा : इलेक्ट्रिक वाहन खरेदी करणार्‍यांना नेहमी एक प्रश्न पडलेला असतो. आपल्या ई-वाहनाची चार्जिंग घर सोडल्यावर आणखी कुठे करायची. मात्र, आता पुणेकरांना याची चिंता करण्याची गरज नाही, कारण पीएमपीएमएल आणि अदानी ग्रुप यांच्या संयुक्तपणे खासगी वाहने चार्जिंगची शहरात ठिकठिकाणी व्यवस्था केली जात आहे. त्याचे काम आता 50 ते 60 टक्क्यांपर्यंत पूर्ण झाले … The post पुणे : ई-वाहनांच्या चार्जिंगची चिंता नाही appeared first on पुढारी.

 0
पुणे : ई-वाहनांच्या चार्जिंगची चिंता नाही

पुणे : पुढारी वृत्तसेवा : इलेक्ट्रिक वाहन खरेदी करणार्‍यांना नेहमी एक प्रश्न पडलेला असतो. आपल्या ई-वाहनाची चार्जिंग घर सोडल्यावर आणखी कुठे करायची. मात्र, आता पुणेकरांना याची चिंता करण्याची गरज नाही, कारण पीएमपीएमएल आणि अदानी ग्रुप यांच्या संयुक्तपणे खासगी वाहने चार्जिंगची शहरात ठिकठिकाणी व्यवस्था केली जात आहे. त्याचे काम आता 50 ते 60 टक्क्यांपर्यंत पूर्ण झाले आहे. पीएमपी प्रशासनाने उत्पन्न वाढीसाठी आणि पुणेकरांच्या वाहनांच्या सोयीसाठी खासगी वाहने चार्जिंग करण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. त्यानुसार अदानी ग्रुपच्या मदतीने शहरात पहिल्या टप्प्यात सात ठिकाणी प्रशस्त अशी चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार आहे. त्याचे नियोजन पीएमपीने काही दिवसांपूर्वीच केले होते. आता या प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू आहे.

पीएमपीला 32.50 टक्के महसूल मिळणार
अदानी टोटल गॅस प्रा.लि. या कंपनीकडून हे काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे आता पुणेकरांची स्वमालकीची वाहने चार्जिंग पीएमपी करणार आहे. पीएमपीकडील वापरात नसलेल्या जागा देण्यात आल्या आहेत. त्या ठिकाणी ही कंपनी सर्व स्ट्रक्चर उभारून पुणेकरांना चार्जिंग सेवा पुरविणार आहे. कंपनी पीएमपी प्रशासनाला 32.50 टक्के पीएमपीला महसुलात वाटा देणार आहे. दोन्ही मनपांची एनओसी असून, संचालक मंडळाच्या बैठकीत या प्रकल्पाला मान्यता देण्यात आली आहे, तसेच, येथे पॉवर सप्लाय पुरविण्यासाठी महावितरणला पत्र देण्यात आले आहे, असे पीएमपी अधिकार्‍यांनी सांगितले.

या सात ठिकाणी होणार चार्जिंग स्टेशन
1) डेक्कन जिमखाना
2) महात्मा गांधी स्टँड, पुलगेट
3) अण्णा भाऊ साठे टर्मिनल, भोसरी पिंपरी
4) हिंजवडी फेज 3
5) भोसरी स्टँड
6) पाषाण-सूस रोड
7) कात्रज सर्पोद्यान

हे ही वाचा : 

रत्नागिरी : ‘सेतू’ अभ्यासक्रमाचा पुन्हा एकदा घाट

नाशिकच्या पाच खेळाडूंना शिवछत्रपती पुरस्कार जाहीर

The post पुणे : ई-वाहनांच्या चार्जिंगची चिंता नाही appeared first on पुढारी.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow