रात्रीच्या वेळी एटीएम फोडणाऱ्या एकाला अटक

रात्रीच्या वेळी एटीएम फोडणाऱ्या एकाला अटक

बीड प्रतिनिधी: बीड शहरात बार्शी नाका रोडवर रात्रीच्या दरम्यान दगडाने एटीएम फोडण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या एका इसमाला पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मात्र एटीएम मधील कॅश सुरक्षित आहेत.

गेल्या काही दिवसापासून बीड शहरांमध्ये चोऱ्याच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत या काही दिवसापूर्वीच बार्शी नाका भागात एटीएम फोडण्याचा प्रयत्न फसला होता आता पुन्हा पोलिसांनी एटीएम कडे पोलिसांनी गस्त वाढवली होती.मात्र रात्री बीड शहरातील बार्शी रोड वरील शिवसेना कार्यालयाच्या बाजूला AXIS बँकेचे ATM असून रात्री 2 च्या सुमारास शिवाजी नगर पोलिसांनी एकाला अटक केले. अक्षय दिलीप गायकवाड रा. पेंडगाव हा रात्री दगडाने ATM मशीन फोडून कॅश कडण्याचाया प्रयत्नात असल्याचे पेट्रोलिंग करत असलेल्या पोलिसांना दिसला. त्याला ताब्यात घेऊन शिवाजी नगर पोलिसांनी रंगेहाथ पकडले. एटीएम मधील कॅश सुरक्षित असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. याचा पुढील तपास शिवाजीनगर पोलीस करत आहेत.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow