शहरात गळफास घेऊन एकाची आत्महत्या

शहरात गळफास घेऊन एकाची आत्महत्या
प्रतिकात्मक

बीड प्रतिनिधी:-  बीड शहरातील इस्लामपुरा भागात एका तरुणाने, गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना, राहत्या घरी घडली आहे. मात्र आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. सदर घटना आज सकाळी उघडकीस आली.

बीड शहरातील पेठ बीड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये इस्लामपुरा भागात, 26 वर्षीय तरुण शेख अमर शेख वाहेद या तरुणाने ओढणीच्या सहाय्याने, राहत्या घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली. आज सकाळी हा प्रकार पाहताच नागरिकांनी तात्काळ, याची पोलिसांना माहिती दिली. यावेळी घटनास्थळी पेठ बीड पोलीस ठाण्याचे पोलीस विठ्ठल देशमुख यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. व सदर घटनेचा पंचनामा केला. मात्र सदर आत्महत्या कोणत्या कारणाने केली हे अद्याप समजू शकले नाही. याचा पुढील तपास पेठ बीड पोलीस करत आहेत.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow