हिरापूर जवळ अपघात एक ठार एक जखमी

हिरापूर जवळ अपघात एक ठार एक जखमी

बीड प्रतिनिधी :अंतरवाली सराटीकडे जाणाऱ्या मराठा बांधवांच्या दुचाकीचा हिरापूर जवळ अपघात झाला असून, यामध्ये एकजण ठार तर एक जण गंभीररित्या जखमी झाला आहे.

 जखमींवर जिल्हा रुग्णालय बीड येथे उपचार सुरू आहेत.आज रविवारी मनोज जरांगे पाटील यांची अंतरवाली सराटी येथे बैठक आयोजित केली होती. यासाठी सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील माडकी गावातील दोन तरुण दुचाकीवरून जात असताना, बीड तालुक्यातील हिरापूर जवळ धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर त्यांची दुचाकी डिव्हायडरला जाऊन धडकली. यामध्ये एकाचा मृत्यू झाला तर एक जण गंभीरित्या जखमी आहे. जखमीवर जिल्हा रुग्णालय बीड येथे उपचार सुरू आहेत. मात्र हनुमंत ननवरे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर मोहन नन्नवरे हे गंभीर जखमी झाले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow