मराठवाडा जीवनगौरव पुरस्काराने पंजाबराव डंख सन्मानित

मराठवाडा जीवनगौरव पुरस्काराने पंजाबराव डंख सन्मानित

आष्टी(अण्णासाहेब साबळे) मराठवाडा मित्र मंडळ अहमदनगर व निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने सी.एस.आर.डी स्टडी सेंटर अहमदनगर येथे नुकत्याच झालेल्या गुणवंत शिक्षक व मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाचे औचित्य साधून अहमदनगरमध्ये स्थायिक झालेल्या प्रतिष्ठितांनी मराठवाडा मित्र मंडळाच्या वतीने मुक्तिसंग्राम दिनांनिमित्त मराठवाड्याचे सुपुत्र जागतिक दर्जाचे प्रसिद्ध हवामान तज्ञ व पर्जन्यमानाचा अचूक अंदाज सांगून शेतकऱ्यांना आधारवड ठरलेल्या व बेमोसमी पावसाची,आवर्षणग्रस्त स्थिती असतानाही परतीचा पाऊस जोरदार होईल असे भाकीत करुन शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटावणारे व्यक्तिमत्व श्री पंजाबराव डख सर सेलू ,परभणी यांना "मराठवाडा जीवन गौरव" पुरस्काराने सन्मानित केले. तसेच शैक्षणिक क्षेत्रात बहुमोल उपक्रम राबवून विद्यार्थ्यी विकास करणाऱ्या ज्या शिक्षकांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल -- व पर्यावरण संवनर्धनात,वृक्षारोपणं पक्ष्यांसाठी मूठभर धान्य व घोटभर पाणी असे उपक्रम यशस्वीपणे राबवून संस्थेचा नवलौकिक सर्वदूर पोहोचवणारे मंडळाचे सचिव -(कार्य व नियोजन)-श्री अनिल लोखंडे सर,अहमदनगर जिल्हा अध्यक्ष - श्री तुकाराम अडसूळ सर,श्री लक्ष्मीकांत ईडलवार सर,श्री बाळासाहेब बोडखे सर आणि जिल्हा परिषद अहमदनगरचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल - श्री राम वाकचौरे ,श्रीमती साधना क्षीरसागर या सर्वांचा यथोचित सन्मान पुणेरी पगडी व जास्त ऑक्सिजन पुरवठा करणारे पिंपळ,वड,लिंब या सारखे वृक्ष कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी पंजाबराव डखसर यांचे शुभहस्ते देऊन करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ सर्जेराव निमसे सर - माजी कुलगुरू स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ अमरावती हे होते,तर समवेत व्यासपीठावर नगर तालुका व शहराचे आमदार श्री संग्राम भैय्या जगताप ,महानगरपालिका आयुक्त - डॉ पंकज जावळे,जिल्हा वनाधिकारी अहमदनगर श्री सचिन कंद ,मंडळाचे राज्यध्यक्ष श्री प्रमोददादा मोरे,सचिव श्रीमती वनश्रीताई मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.प्रारंभी विद्यार्थ्यिनींनी स्वागतगीत,दिपवंदना नृत्य,राष्ट्रभक्तीपर समूह नृत्य सादर करून प्रेक्षकांचे मन जिंकून घेतले.त्यानंतर डॉ सुधाताई कांकरिया यांनी पंजावराव डख यांची मुलाखत घेत त्यांच्याकडून पर्जन्यमानाची,पर्यावरण बदलाची,वाऱ्यांची दिशा व त्याचा पावसावर होणारा परिणाम अशी माहिती दिली डख साहेब म्हणाले की भविष्यात आपण वृक्षारोपणं करून जैविविधतेस पुरक वातावरण निर्माण केले नाही तर अनेक संकटांना समोरे जावे लागेल हा समतोल राखणे प्रत्येकाची जबाबदारी आहे यावेळी प्रसिद्ध व्यवसायिक डॉ प्रकाश कांकरिया यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले,तर शेवटी प्रमोद काकडे यांनी आभार मानले.हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी निसर्ग व समाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे श्रीमती छायाताई राजपूत,उपाध्यक्ष प्रकाश केदारी , सुभाष वाखारे,पुणे जिल्हाध्यक्ष मारुती कदम,प्रा.बबन जाधव, राज्य संपर्क प्रमुख उत्तम पवार,राज्य प्रसिद्ध प्रमुख 'पत्रकार' आण्णासाहेब साबळे,प्रा.प्रविण गुणवरे,हरिभाऊ शिंदे,बेबी कांबळे,प्रा संतोष परदेशी,प्रा विलास नाबदे,प्रा दादासाहेब जवरे,अर्जुन राऊत,चंद्रकांत भोजने,बाळासाहेब डोंगरे,कल्पना भामरे,अनघा नांदापुरकर,वर्षा घुले,वैभव मोरे,विजय पवार,भानुदास शिंदे,अक्षय खिलारी,आनंदा झरेकर,संजय कारखिले ,सुनिल कार्ले,सुधाकर शेटे,दिनकर दातीर,सखाराम मेसे,आभाळे सर,ॲड पल्लवी कांबळे,मनिषा कदम आदी पर्यावरण प्रेमी पदधिकाऱ्याचे सहकार्य लाभले...

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow