चोरमले वस्तीवरून व्यक्ति बेपत्ता
मांजरसुंबा येथून जवळच असलेल्या चोरमले वस्ती येथील आश्रुबा मारुती चोरमले वय 55 हे मागील आठ दहा दिवसापासून बेपत्ता असून ते हरवल्याची तक्रार नेकनूर पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आली आहे.
मांजरसुंबापासून जवळच असलेल्या चोरमले वस्ती येथील रहिवासी आश्रुबा मारुती चोरमले हे इसम मागील 27 मे रोजी घरात काहीतरी किरकिर झाल्यामुळे ते घरातून निघून गेले आहेत जाताना ते घरी म्हणाले की मी दोन दिवसात गावावरून जाऊन येतो परंतु आज पर्यंत ते परत आले नसून ते बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांच्या घरच्यांनी नेकनूर पोलीस स्टेशन येथे केली आहे हे इसम जर कोणाला आढळून आल्यास मोबाईल नंबर 7972862233 9767829699 या नंबर वर किंवा नेकनूर पोलीस स्टेशन येथे संपर्क साधण्याचे आव्हान नेकनूर पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे
What's Your Reaction?