श्रमदानातून बिरसा फाइटर्सने बुजवले खड्डे

श्रमदानातून बिरसा फाइटर्सने बुजवले खड्डे

धडगाव (प्रतिनिधी):२६ नोव्हेंबर २०२३ रोजी संविधान दिनी बिरसा फायटर्स चूलवड गाव शाखेकडून श्रमदानातून बाहगाया ते चूलवड रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात आले. जे काम आमदार, खासदार ,लोकप्रतिनिधींनी म्हणजेच सरकारने सरकारी निधीतून करायला पाहिजे,ते काम बिरसा फायटर्स फुकटात श्रमदानातून करत आहे,असा कौतुकाचा सूर जनतेतून येऊ लागला आहे. निष्क्रिय आमदार, खासदार व लोकप्रतिनिधींच्या श्रेत्रात बिरसा फायटर्सने चूलवड ते बाहगाया गावापर्यंत लोकसहभागातून रस्त्यावरील खड्डे बुजवत आहे.या कामात चूलवड गावातील राजेंद्र पावरा यांच्याकडून १ जेसीपी,दुल्लभ पावरा यांच्याकडून १ ट्रॅक्टर व ग्रामपंचायत चूलवड कडून पाण्याचे टँकर ची मदत मिळाली.

            पावसामुळे श्रमदानाच्या कामात व्यत्यय आला,तरी पावसात भिजत खड्डे बुजवले.खड्डे बुजवता बुजवता वारा पावसाने रस्त्यावर झाडे आडवी पडली,ती झाडे बाजूला सारून वाहनांना- प्रवाशांना रस्ता मोकळा करून दिला.या श्रमदानात बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,चूलवड गांव अध्यक्ष विजय पावरा,माजी धडगाव तालुकाध्यक्ष राजेंद्र पावरा,सायसिंग पावरा,आपसिंग पावरा,नितीन पावरा, सचिन वळवी,बोडा महाराज,मुकेश पावरा,रोहन वळवी,राहुल वळवी,किरण पावरा,नितेश पावरा,पवन पावरा,करण पावरा,गोविंद पटले,गोतम पटले,जयसिंग वळवी,दिलीप पावरा,यांसह ४० ते ५० गांवकरी बांधव सहभागी झालेत. श्रमदानात सहभागी झालेल्या सर्व गांवकरी बांधवांचे मनपूर्वक आभार! बिरसा फायटर्सचे चूलवड गाव अध्यक्ष विजय पावरा यांनी जाहीर आभार मानले आहेत.याच रस्त्याचे अक्राणी अक्कलकुवा मतदारसंघाचे आमदार तथा माजी आदिवासी विकासमंत्री के.सी.पाडवी यांच्या हस्ते दिनांक २८ नोव्हेंबर २०२३ रोजी भूमिपूजन होणार आहे.त्याआधीच बिरसा फायटर्स कार्यकर्त्यांनी रस्त्यावरील खड्डे बुजवून मंत्री, आमदार व खासदारांचे डोळे उघडले आहेत.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow