गांजाच्या शेतीवर पोलिसांचा छापा

गांजाच्या शेतीवर पोलिसांचा छापा

बीड प्रतिनिधी: नेकनूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेलखंडी पाटोदा शिवारात अवैध गांजाच्या झाडावर पोलिसांनी कारवाई केली असून ऐवज जप्त केला आहे.याप्रकरणी नेमणूक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दि.18/09/2024 रोजी पोलीस ठाणे नेकनूर हददीत गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, बेलंखडी (पाटोदा) ता. जि. बीड येथे शेतात गांजाची झाडे लावलेली आहेत. मिळालेल्या बातमीची माहिती पोलिसांनी वरिष्ठांना सांगून संपुर्ण छाप्याची तयारी केली. सदर ठिकाणी सपोनि चंद्रकांत गोसावी, पोउपनि रोकडे, मंडळ अधिकारी डरपे, शासकिय पंच, पोलीस ठाणे स्टाफ सह जावून छापा घातला बेलखंडी शिवार येथील गायरान जमीन शेत सर्वे क्र 21 येथील शेतात गांजाची लहान-मोठी 15 झाडे त्याचे वजन 4.465 किलोग्रॅम असे मिळून आले. त्याचा दोन शासकिय पंचासमक्ष पंचनामा करून जप्त केले असून सदर जमीन कसणारे 1. मोहन किसन मोरे 2. महावीर मोहन मोरे संतोष मोहन मोरे 4. जितु मोहन मोरे सर्व रा. बेलखंडी ता.जि. बीड यांचे विरूध्द पोलीस ठाणे नेकनूर येथे गुरनं 273/2024 कलम 20 (अ) 1,8 (क) एनडीपीएस अॅक्ट प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे. सदरची कारवाई मा. अविनाश बारगळ पोलीस अधीक्षक, बीड, मा. चेतना तिडके अपर पोलीस अधिक्षक अंबाजोगाई, मा. कमलेश मिना सहा. पोलीस अधीक्षक, उप विभाग केज यांचे मार्गदनाखाली सपोनि चंद्रकांत गोसावी, पोउपनि अप्पासाहेब रोकडे, पोह 1244 राउत, पोह 1203 डोंगरे, पोह 1547 बळवंत, पोना 1830 भंडाणे, पोना 1897 राउत, पोना 1734 वंजारे, पोना 837 राख, पोशि 109 तांदळे, पोशि 1895 काळे, पोशि 1885 क्षिरसागर, पोशि 444 ढाकणे यांनी केलेली असून गुन्हयाचा पुढील तपास सपोनि चंद्रकांत गोसावी करीत आहेत.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow