आमंत्रण हॉटेलवर पोलिसांचा छापा देशी-विदेशी दारू केली जप्त

आमंत्रण हॉटेलवर पोलिसांचा छापा देशी-विदेशी दारू केली जप्त
आरोपीसह दारूसाठा ताब्यात घेताना पोलीस दिसत आहेत

चकलांबा पोलीस ठाणे हद्दीमध्ये तिंतरवणी येथे आमंत्रण हॉटेलवर पोलिसांनी धाड टाकून देशी-विदेशी दारू जप्त केली आहे. सदर कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक एकशिंगे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील पो.स्टे.चकलांबा हद्दीत अवैद्य देशी व विदेशी दारु विक्रेत्यांवर तिंतरवणी गावातील मुख्य रोडवरील महामार्ग क्रमांक 222 लगत आमंत्रण हॅाटेलवर पोलिसांनी रेड कली असता देशी दारुची 180 ML च्या 19 बॅाटल व विदेशी वेगवेगळ्या कंपणीच्या 67 बॅाटल असा एकुण 12640 रुपये किंमतीचा मुद्दमाल जप्त करुन आरोपी नामे अशोक बाळासाहेब नागरगोजे वय-32 वर्ष रा.वडाचीवाडी ता.शिरुर का. जि.बीड विकास बाबुराव यमगर वय- 20 वर्ष रा. शिंगारवाडी ता.शिरुर का.जि.बीड यांना ताब्यात घेवुन चकलांबा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. सदर कारवाई ही आम्ही सपोनि एकशिंगे व सोबत पोउपनि अनंता तांगडे, पोह बारगजे व पोअं मिसाळ पोलीस कर्मचाऱ्यांनी केली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow