राजन नायर यांची राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस पदी नियुक्ती

 0
राजन नायर यांची राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस पदी नियुक्ती

छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, डाॅ.बाबासाहेब आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते, सुशिक्षित, स्वाभिमानी कार्यकर्ता प्रा. राजन नायर यांना राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी पक्षाच्या महाराष्ट्र राज्य समिती मध्ये सरचिटणीस पदावर राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी राज्य अध्यक्ष श्री. जयंत पाटील यांच्या हस्ते नियुक्ती 

विविध क्षेत्रात कार्यरत (शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक, क्रिडा, पत्रकारिता)तसेच राजकीय क्षेत्रात कार्यरत असणारे व समाजातील गरजू विद्यार्थ्यांना सदैव मदतीचा हात पुढे करून त्यांना मार्गदर्शन करणारे व राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी मध्ये पिंपरी चिंचवड कार्यकारी समिती सदस्य मा.राजन नायर यांची राज्य सरचिटणीस पदावर राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी प्रदेश अध्यक्ष जयंतराव पाटील यांनी नियुक्ती पत्र देवुन नियुक्ती केली आहे.

       यावेळी श्री. राजेश टोपे माजी मंत्री महाराष्ट्र राज्य, श्री. जितेंद्र आव्हाड माजी मंत्री, श्री. महेबुब शेख. युवाध्यक्ष महाराष्ट्र राज्य, श्री. सुनील गव्हाणे.विद्यार्थी प्रदेश अध्यक्ष, बबन गिते महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष, बीडचे युवा नेते प्रा, शिवराज बांगर , पिंपरी चिंचवड शहर युवाध्यक्ष श्री. इम्रान शेख व श्री. देवेंद्र तायडे वरिष्ठ नेता राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी हे उपस्थित होते.

        श्री. राजन नायर यांनी आपणांवर सोपवलेली जबाबदारी अतिशय प्रामाणिकपणे व विश्वासू पणे करतील असे आश्वासन दिले व पार्टीला मजबूत करण्यासाठी कसोटीचे प्रयत्न करीन असे विचार त्यांनी व्यक्त केले व राज्य अध्यक्ष श्री. जयंत पाटील यांनी श्री. राजन नायर यांना दिलेली जबाबदारी योग्य रितीने पूर्ण करण्यास शुभेच्छा दिल्या. 

       यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या कार्याध्यक्षा सौ.सुप्रियाताई सुळे, तरूणांचा बुलंद आवाज आमदार रोहित पवार, सौ. रोहिणी खडसे महिला अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माजी आमदार श्री. जयदेव गायकवाड, आमदार श्री. अशोक पवार, श्री. प्रशांत जगताप,पंडित कांबळे. राज्य उपाध्यक्ष,श्री. अरूण बोराडे वरिष्ठ नेता, श्री. जावेद हबीब राज्य अल्पसंख्याक अध्यक्ष,सर्व सदस्य पिंपरी चिंचवड कार्यकारी समिती सदस्य,सौ.हमिना शेख महिला राज्य सचिव , महिला अध्यक्ष सौ.ज्योती निंबाळकर, सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष श्री. मयूर जाधव, ओबीसी सेल अध्यक्ष विशाल जाधव, विद्यार्थी अध्यक्ष राहुल अहिर,श्री. के.डी.वाघमारे, श्री. संदिप चव्हाण, श्री. अनिल भोसले, श्री. विशाल क्षीरसागर, रोहित जाधव, ओम क्षीरसागर, कम्रुनिजा शेख, स्वप्निल असुळे,विशाल पवार, महादेव पाटील, बिरूदेव मोटे,विजय पिरांगुटे, राजू खंडागळे, योगेश, आश्विनी भालेराव, सचिन निंबाळकर, राजेश बारसागळे, अतुल भोसले , बीडचे युवा सामाजिक कार्यकर्ते विवेक कुचेकर व सर्व पदाधिकारी यांनी उपस्थिती दिली व शुभेच्छा दिल्या व या मुळे पिंपरी चिंचवड शहरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow

SUNIL JADHAV Journalist Sunil Jadhav, an exceptional reporter and journalist, has made a remarkable impact through his platform, ilovebeed.com. With his relentless dedication and deep-rooted love for the city of Beed, Jadhav has become a voice that resonates with the people, capturing the essence of this vibrant region.