पूर्णवादी कर्ज प्रकरणात चौकशीसाठी समिती गठीत करण्याची शिफारस

पूर्णवादी कर्ज प्रकरणात चौकशीसाठी समिती गठीत करण्याची शिफारस

बीड प्रतिनिधी:- पूर्णवादी बँक 100 कोटींचे बेकायदेशीर कर्ज वाटप प्रकरनी पाच सदस्य चौकशी समिती गठीत करण्याचे जिल्हा उपनिबंधक यांची सहकार आयुक्ताकडे शिफारस केली आहे.तसेच माजलगाव शाखेचे वादग्रस्त व्यवस्थापक शेंडगे यांनाही पाठवले सक्तीच्या रजेवर 

 राज्यात शाखा विस्तार असलेल्या पूर्णवादी नागरिक सहकारी बँकेने आपल्या 18 शाखातून शंभर कोटीहून अधिक रकमेची कर्ज वाटप करून भारतीय रिझर्व बँक यांच्या नियमाची पायमल्ली केल्याने सर्व कर्ज प्रकरणाची सखोल चौकशी करून बँकेचे अध्यक्ष डॉक्टर अरुण गोविंद निरंतर यांच्यासह दोषी संचालकांना, शाखाधिकारी यांच्यावर गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्राचे मराठी पत्रकार संघाचे विभागीय उपाध्यक्ष सोमेश्वर सोनटक्के सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब सोनटक्के हे चार मार्चपासून जिल्हाधिकारी कार्यालय बीड समोर आमरण उपोषणाला बसलेले होते जिल्हा उपाध्यक्ष बीड यांनी चौकशी समिती गठीत करण्यासाठी माननीय सहकार आयुक्त पुणे यांना शिफारस केले तर बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी माजलगाव शाखेचे व्यवस्थापक श्री शेंडगे यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याची कारवाई तात्काळ केल्याने तूर्तास उपोषणास स्थगिती देण्यात आली. मागील अनेक वर्षापासून पूर्णावती बँकेचे विद्यमान अध्यक्ष डॉक्टर अरुन गोविंद निरंतर यांचा बँकेच्या कामकाजावर कसलाही वचक राहिलेला नाही त्यामुळे त्यांच्या जवळच्या मंडळींनी हवा तसा कारभार केला यास डॉक्टर निरंतरही कारणीभूत आहेत. बँकेच्या अनेक प्रकरणात अनागोंदी, मनमानी यांनी कळस घातला होता. पूर्णवादी बँकेत चाललेला सावळा गोंधळ हा अनेकांच्या चर्चचा विषय होता. बँकेने एका एका कुटुंबात पहिले दुसरे थकीत कर्ज असताना तिसऱ्या कर्ज वाटप केले असा प्रकार मोठा घडल्याने जवळपास एकाच आर्थिक वर्षात बेकायदेशीर कर्ज 100 कोटीच्या घरात आहे म्हणून माहिती अधिकार च्या आधारे माहिती उपलब्ध करून रीतसर तक्रार करून बँकेचे अध्यक्ष डॉक्टर अरुण गोविंद निरंतर यांच्यासह दोषी आढळणाऱ्या संचालक शाखाधिकारी यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी यासाठी उपोषण करण्यात आले.चार दिवस चाललेल्या उपोषणामुळे बीड शहरात चर्चेचं पेव फुटले होते.माजलगाव शाखेचे व्यवस्थापक शेंडगे हे काम करत असताना मोठ्या प्रमाणावर दूजाभाव करून अनेकदा अपमानित. करून बँकेतून पिटाळून लावल्याचा लाजिरवाण्या घटना घडल्या होत्या.या संदर्भात सुद्धा वरिष्ठांकडे अनेकदा तक्रारी करून उपयोग झाला नव्हता परंतु बँकेच्या व्यवस्थापनाने आमच्या तक्रारीची दखल घेऊन शाखाधिकारी शेंडगे यांना दहा दिवसाच्या सक्तीच्या रजेवर पाठवून इतर जिल्ह्यात बदली करत असलेने आम्ही चालू उपोषण तूर्त स्थगित केले.जिल्हा

उपनिबंधक कार्यालयात चे एस बी जाधव सहकार अधिकारी श्रेणी एक,आर.एम. मोटे,उपनिबंधक बीड, एस.एल.बेटकर,सहकार अधिकारी शिवाजी नगर पोलीस स्टेशन चे एपी आय विलास मोरे,उप कार्यकारी अधिकारी राजुरकर,लेखापाल असल्कर, पूर्ण वादी बँकेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश गोरकर , जमादार एस एस घोळवे यांची उपस्थिती होती.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow