शिवसेना माजी जिल्हाप्रमुख खांडे यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

शिवसेना माजी जिल्हाप्रमुख खांडे यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

बीड प्रतिनिधी: शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांना 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी, जिल्हा व सत्र न्यायालय बीड यांनी दिली आहे. आज शुक्रवारी खांडे यांना न्यायालयामध्ये हजर करण्यात आले होते.

गेल्या काही महिन्यापूर्वी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर खांडे यांना मारहाण करण्यात आली होती. या प्रकरणात शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांना आरोपी करण्यात आले होते. या प्रकरणी खांडे यांच्यावर बीडच्या ग्रामीण पोलीस ठाण्यात कलम 307 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच काही दिवसांमध्ये त्यांची कथित ऑडिओ क्लिप वायरल झाली होती, त्यानंतर पुन्हा खांडे चर्चेत आले. आणि बीडच्या स्थानिक गुन्हे शाखा यांनी खांडे यांना जामखेड येथून अटक केले. त्यानंतर काही दिवस न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली होती. आज शुक्रवार दिनांक 5 जुलै रोजी पुन्हा खांडे यांना बीडच्या जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले.तेव्हा कुंडलिक खांडे यांना आता 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. पोलिसांनी अजून पोलीस कोठडीची मागणी केली होती. मात्र खांडे यांच्या वकिलाने बाजू मांडल्याने  न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आता त्यांना लवकरच जामीन मिळू शकतो, असे त्यांच्या वकिलांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow