अबॅकस परीक्षेत शिवाजी मुंडेला गोल्ड मेडल

अबॅकस परीक्षेत शिवाजी मुंडेला गोल्ड मेडल

बीड (प्रतिनिधी) शालेय विद्यार्थ्यांमध्ये सुप्तगुणांचा विकास करण्याच्या मार्गाने अबॅकस गणितीय पध्दतीचा उपयोग होतो. बीड मधील अबॅकस व वैदिक स्टडी केंद्राद्वारे, आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय , राज्य स्तरावर, अबॅकस आणि वैदिक चॅम्पियनशिप आयोजित केल्या जातात. राष्ट्रीय स्तरावरील ऑनलाइन अबॅकस चॅम्पियनशिप मध्ये प्रणव शिवाजी मुंडेला संधी मिळाली आहे. बीडच्या अबॅकस सेंटरमध्ये 21 डिसेंबर 2023 रोजी निकाल जाहीर झाल्याप्रमाणे सर्वोत्कृष्ट गोल्ड मेडल मिळवणारl प्रणव मुंडे सर्वोत्‍कृष्‍ट रँक मिळवून चॅम्पियनशिपमध्ये सहभाग मिळवला आहे. जागतिक अबॅकस स्पर्धा जानेवारी 2024 मध्ये होत असून त्यामध्ये भारतासह नेपाळ, श्रीलंका, युनायटेड किंग्डम, यु एस ए , सिंगापूर, झिंबाब्वे, दक्षिण आफ्रिका, देशांमधील दोन हजार पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना सहभाग घेणार आहेत. प्रणव मुंडेच्या यशामध्ये आई, वडील आणि शिक्षक यांचे सहकार्य लाभले असे तिने सांगितले आहे. अरिस्तो किड्स मॅनेजिंग डायरेक्टर उज्वल पांडा ओरिसा आणि अबॅकस स्टडी सेंटरचे आयोजक डॉ. ए एस घोडके यांनी प्रणव मुंडेनी मिळवलेल्या यशाचे अभिनंदन केले असून उज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. समाजातील सर्व स्तरांमधून प्रणव मुंडेचे अभिनंदन होत असून उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत असे जिल्हा अबॅकस वितरक एस. ए. घोडके यांनी सांगितले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow