धनादेश न वटले प्रकरणे सहा महिन्याची शिक्षा व आठ लाखाचा दंड
बीड प्रतिनिधी:- धनादेश न वटले प्रकरणी आरोपीस सहा महिन्याची शिक्षा व आठ लाख रुपयांचा दंड जिल्हा व सत्र न्यायालय बीड यांनी ठोठावला आहे.
प्रकरणाची थोडक्यात हकीकत अशी की, फिर्यादी ॲड. सागर शहाजीराव नाईकवाडे हे व आरोपी जावेद रहीम सय्यद रा. भाटवडगाव ता. माजलगाव जि. बीड याचे व फिर्यादीमध्ये मागील चार वर्षापासुन ओळखीचे, मित्रत्वाचे स्नेहाचे संबंध आहेत आरोपीने फिर्यादी यांचे कडून घरगुती व व्यवसायिक अडचण आहे. असे सांगून स्वकम रु.५,००,०००/- (पाच लाख रु.) ची ऑगस्ट २०१५ मध्ये मागणी केली होती. आरोपीचे फिर्यादी यांचे सोबत असलेले संबंध पैसे परत करणेच्या कुवतीचा विचार करून फिर्यादी यांनी आरोपीस रक्कम रु.५,००,०००/- (पाच लाख रु.) हातउसने दिले. सदर रक्कम आरोपीने फिर्यादी यांना नोव्हेंबर २०१५ या महिन्यात परत करील, असे सांगीतले. फिर्यादी यांना माहे नोव्हेंबर २०१५ मध्ये रक्कमेची गरज भासल्याने फिर्यादी यांनी आरोपीस सदर रकमेची मागणी केली असता, आरोपीने त्याचे खाते असलेल्या स्टेट बँक ऑफ हैद्राबाद शाखा कोथरूड, पुणे चा खाते क्र. ६२४२४९८७९५८ चा धनादेश क्र. ७०२६३४ रक्कम रु.५,००,००० /- (पाच लाख रु.) दिनांक १६.११.२०१५ रोजीचा दिला व सदर धनादेश वटला जाईल, अशी हमी फिर्यादी यांना दिली. आरोपीच्या शब्दावर विश्वास ठेवून फिर्यादी यांनी त्यांचे खाते असलेल्या बँकेत उपरोक्त धनादेश वटनावळीस दि. १६.११.२०१५ रोजी टाकला असता, सदरील धनादेश न वठता संबंधित बँकच्या "अपुरी रक्कम" (FUNDS INSUFFICIENT ) या शेऱ्यासह दिनांक १८.११.२०१५ रोजी परत आला. फिर्यादी यांनी आरोपीस धनादेश न
वठल्यामुळे वकीला मार्फत दि. १४.१२.२०१५ रोजी सदरच्या धनादेशा वरील रक्कम रु.५,००,०००/- (पाच लाख रु.) मागणी करणारी नोटीस आरोपीच्या अचुक पत्त्यावर पाठवली. सदर नोटीस घेण्यास आरोपीने इन्कार केला. नोटीसची माहिती मिळूनही आरोपीने मुदतीत धनादेशावरील रक्कम आरोपीने फिर्यादी यांना दिलेली नाही. सदरील नोटीसची माहिती होऊनही आरोपीने फिर्यादी यांना नोटीसच्या मुदतीत सदरील चेकची रक्कम रु.५,००,००० /- (पाच लाख रु.) परत केली नाही म्हणून फिर्यादी यांनी आरोींविरोधात कलम १३८ निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट अॅक्टप्रमाणे प्रमाणे प्रकरण मा. प्रथमवर्ग न्यादंडाधिकारी साहेब बीड यांचेकडे दाखल केले.त्यानंतर फिर्यदीचे विकीलीचे शिक्षण पूर्ण झालेनंतर फिर्यादी ॲड. सागर नाईकवाडे यांनी त्यांचे प्रकरण स्वतः चालवले सदर प्रकरणात फिर्यादीची साक्ष नोंदवण्यात आली त्यानंतर आरोपी व इतर दोन साक्षीदार यांची साक्ष नोंदवण्यात आली फिर्यादीच्या वतीने न्यायलयासमक्ष सादर करण्यात आलेले कागदपत्रे व पुरावे व केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून मा. न्यायालयासमक्ष दाखल केलेल्या कागदपत्रांच्या पुराव्यास गृहीत धरून मा. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी साहेब बीड यांनी आरोपीस धनादेश रक्कम अधिक 3 लाख दंड व सहा महिन्याची शिक्षा ठोठावण्यात आली सदर प्रकरणात स्वतः फिर्यादी ॲड. सागर नाईकवाडे यांनी स्वतः काम पाहिले त्यांना ॲड. राजेश जाधव ॲड. सतीश गाडे. ॲड.बाळासाहेब गायकवाड, ॲड. संदीप जोगदंड, ॲड. सुधीर जाधव, ॲड. विवेक डोके यांनी सहकार्य केले.
What's Your Reaction?