बीड शहरात विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या

बीड शहरात विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या

शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एका विद्यार्थिनीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सदर घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले होते.

 शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये असणाऱ्या शिवाजी धांडे नगर येथे निकिता रेनाजी भोसले या सतरा वर्षीय विद्यार्थिनीने स्वतःच्या घरामध्ये गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली. तिने ओढणीच्या साह्याने हा गळफास घेतला. ती बीड तालुक्यातील भवनवाडी येथील रहिवासी होती.सदर घटना उघडकीस येताच नागरिकांनी शिवाजीनगर पोलिसांना याची माहिती दिली.यावेळी तात्काळ घटनास्थळी शिवाजीनगर पोलीस दाखल झाले. पोलीस कर्मचारी राडकर यांनी सदर घटनेचा पंचनामा केला. मात्र सदर आत्महत्या कोणत्या कारणाने झाली हे अद्याप स्पष्ट झाले नाही .याचा पुढील तपास शिवाजीनगर पोलीस हे करत आहेत.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow