कार चालकाची गॅरेज मध्ये आत्महत्या

कार चालकाची गॅरेज मध्ये आत्महत्या

आष्टी प्रतिनिधी:-  गावाकडे जात असताना अचानक (एम एच १२, डी एम ६००२) हि कार बिघडल्याने दुरुस्तीसाठी गॅरेजमध्ये आणली दुसऱ्या दिवशी विजय कल्याण थोरात वय (वर्ष ३२ राहणार ईट जिल्हा धाराशिव ) या चालकांनी गॅरेज मधील एका खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली ही घटना कडा येथे शुक्रवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली थोरात पुणे येथे चालक म्हणून कामाला होता गुरुवारी गावाकडे येताना त्यांची कार दुरुस्तीसाठी तो कडा येथील एका गरेजवर आला तेथेच गळफास घेतला कडा पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक काकडे, पोलीस नाईक विकास जाधव, पोलीस आमदार दीपक भोजे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आत्महत्यांची कारण अद्याप स्पष्ट झाले नाही

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow