शिवसेना बीड संघटक पदी सुनील सुरवसे

शिवसेना बीड संघटक पदी सुनील सुरवसे

शिवसेनेच्या बीड जिल्हा संघटक पदी सुनील सुरवसे यांची निवड

शिवसेना मजबुती साठी कार्यतत्पर व्यक्तीच्या हातात संघटकपद !

बीड प्रतिनिधी: वंदनीय हिंदुह्दयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व शिवसेना मुख्य नेते राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार बीड जिल्हा प्रमुख अनिल दादा जगताप व सचिन भैय्या मुळूक यांच्या सूचनेनुसार शिवसेना सचिव श्री संजय मोरे साहेब यांनी बीड जिल्हा संघटक पदी शिवसेना पक्षाला मजबूत करण्याची धमक असणार्या सुनील सुरवसे यांची निवड केली आहे.

         गेल्या अनेक वर्षापासून बीड शहराचे शिवसेनेचे शहर प्रमुख पदी राहुन सुनील सुरवसे यांनी आपल्या कार्यतत्पर तथा शिवसैनिकांची फौज निर्माण करणारे व्यक्तीमत्व अशी ओळख निर्माण केलेली होती .त्यांचा कामाचा, कार्याचा आणी पक्षाप्रतीची निष्ठा पाहून शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी सुनिल सुरवसेंच्या कार्याची दखल घेतली आहे. आतापर्यंत बीड शहर शिवसेनेत बरेच शहर प्रमुख झाले पण सर्वांच्या ओठावर आणी ह्दयावर राज्य करणारे शहर प्रमुख म्हणुन सुनील सुरवसे यांचेच नाव अग्रक्रमाने घेण्यात येतं होते. गेल्या दोन वर्षांपूर्वी शिवसेना जेव्हा एकच (एकत्र) शिवसेना होती तेव्हा शिवसेनेमध्ये जिल्हाप्रमुखांचा वाद असल्यामुळे शिवसेना जिल्हाप्रमुख पद रिक्त होते त्या वेळेस बीड शहरातील शिवसेना पक्ष हा डगमगीला आलेला होता,परंतु त्याच शिवसेना पक्षाला नवसंजीवनी देऊन आणी नवी उभारी देऊन जिवंत ठेवण्याचे काम सुनिल सुरवसे यांनी अनिल जगताप यांच्या साथीने करुन दाखवले होते.बीड शहरात आपल्या कार्यकुशल नेतृत्वामुळे शिवसेनेची ताकद सुनील सुरवसे यांनी दाखवून दिली होती,म्हणूनच बीड जिल्हा प्रमुख अनिल दादा जगताप यांचे कट्टर समर्थक समजले जाणारे सुनील सुरवसे यांची शिवसेनेच्या वरिष्ठ पदाधिकारी व नेते मंडळींनी यांनी पुन्हा सुनिल सुरवसेंना पसंती देत, राज्याचे मुख्यमंत्री शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे शिफारस केली व मुख्यमंत्री साहेब साहेबांच्या आदेशानुसार बीड जिल्हा संघटक पदी निवड केली , सुनिल सुरवसे यांना संघटक पद दिल्यामुळे शिवसेना पक्षाचे संघटन अधिकच मजबुत होऊन शिवसेना पक्षाची ताकद बीड जिल्ह्यात पुन्हा दुप्पटीने वाढणार आहे या बाबत तिळमात्र शंका नाही, कारण योग्य पदासाठी योग्य निवड करुन वरिष्ठांनी योग्य व्यक्तीच्या कार्यकर्तुत्वाला न्याय दिला आहे असा आनंद शिवसैनिक व्यक्त करतांना दिसत आहेत.या निवडीबद्दल पूर्ण बीड जिल्ह्यातून सुनील सुरवसे यांचे अभिनंदन करण्यात येत आहे

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow