स्विफ्ट डिझायर कार आणि दुचाकीचा भीषण अपघात,पोलीस उपनिरीक्षकाचा मृत्यू

स्विफ्ट डिझायर कार आणि दुचाकीचा भीषण अपघात,पोलीस उपनिरीक्षकाचा मृत्यू

बीड प्रतिनिधी: एका स्विफ्ट डिझायर कारने पोलीस बंदोबस्तासाठी जात असणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाच्या दुचाकीला जोराची धडक दिली. यामध्ये दुचाकी वरील एकाचा मृत्यू तर एक जण गंभीरित्या जखमी आहे. जखमीला तात्काळ बीड शहरातील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

बीड जिल्हा पोलीस भरती उमेदवारांची लेखी परीक्षा, आज रविवार दिनांक सात जुलै रोजी आयोजित करण्यात आली होती. याच पोलीस भरती प्रक्रियेच्या बंदोबस्तासाठी, दिंद्रुड पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक श्रीधर नन्नवरे, हे त्यांच्या दुचाकी क्रमांक एम एच 23 एके 93 97 या दुचाकीवरून बीड शहराकडे येत असताना, नेकनूर परिसरात त्यांच्या दुचाकीला समोरून येणाऱ्या स्विफ्ट डिझायर कार क्रमांक एम एच 23 बीसी 2108 या कारने जोराची धडक दिली. यामध्ये दुचाकी वरील पोलीस उपनिरीक्षक श्रीधर नन्नवरे यांचा जागीच मृत्यू झाला. तर पोलीस उपनिरीक्षक नागरगोजे हे गंभीरित्या जखमी झाले आहेत. त्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सदर घटनेने जिल्हाभर मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow