चौसाळ्यात मराठा आरक्षण कृती समितीकडून लाक्षणिक उपोषण

चौसाळ्यात मराठा आरक्षण कृती समितीकडून लाक्षणिक उपोषण

चौसाळा प्रतिनिधी:-  महात्मा गांधी जयंतीच्या दिनी चौसाळ्यात मराठा आरक्षण कृती समितीकडून दोन तास लाक्षणिक उपोषण संपन्न झाले

 सध्या महाराष्ट्रात मराठा आरक्षणाच्या संदर्भात मनोज जरांगे पाटील यांनी जो लढा चालू केला आहे त्या संदर्भात संपूर्ण महाराष्ट्रात वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन केले जात आहेत त्याच अनुषंगाने आज दिनांक 2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त चौसाळ्यातील मराठा आरक्षण कृती समिती च्या वतीने मराठा आरक्षणाच्या मागणीची ज्योत तेवत ठेवण्यासाठी चौसाळा ग्रामपंचायत कार्यालयासमोर दोन तास लाक्षणिक उपोषण करण्यात आले व त्या संदर्भातील निवेदन शासनापर्यंत पोहोचविण्यासाठी शासनाचे प्रतिनिधी म्हणून चौसाळा ग्रामपंचायत कार्यालयाचे ग्राम विस्तार अधिकारी बाबासाहेब चव्हाण यांच्याकडे मराठा आरक्षण कृती समितीचे ज्येष्ठ मार्गदर्शक जालिंदर आबा बारंगुळे यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी या लाक्षणिक उपोषणासाठी मराठा आरक्षण कृती समितीतील कार्यकर्ते सह, चौसाळा व चौसाळा पंचक्रोशीतील सर्व ज्येष्ठ मार्गदर्शक सदस्य, युवक सदस्य, इतर समाजातील युवक कार्यकर्ते, पत्रकार व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow