मुलीचे प्रेम प्रकरण लपवण्यासाठी आईनेच केला बापाचा खून
Pune News in Marathi: Find the latest news in Pune | पुणे मराठी बातम्या and more at Ilovebeed
पुणे जिल्ह्यात खुनाची एक खळबळजनक घटना समोर आली आहे. या घटनेत पत्नीने पतीचा खून केला आहे. अल्पवयीन मुलींचे दुसऱ्या एकाशी प्रेमसंबंध होते. हे प्रेमसंबंधावरुन पती-पत्नीत वाद होते होते. मग पत्नीने क्राईम बेब सिरीज पहिल्या. त्यानंतर पतीचा काटा काढण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी मुलींच्या प्रियकराला सोबत घेतले. या प्रकरणी पोलिसांनी वेगाने तपास करत दोन्ही आरोपींना अटक केली. आरोपींना खून केल्याची कबुली दिली आहे.
पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर येथील ही खुनाची घटना आहे. या घटनेतील आरोपी ॲग्नेल कसबे याचे जॉन्सन लोबो याच्या अल्पवयीन मुलीशी अनेक दिवसांपासून प्रेमसंबंध होते. त्यांच्या या प्रेमसंबंधाला आरोपी सॅन्ड्रा लोबो हिची संमती होती, परंतु मयत जॉन्सन लोबो याचा विरोध होता. त्यामुळे आरोपी सॅन्ड्रा लोबो अन् मयत जॉन्सन लोबो यांच्यांत वाद होत होते. यामुळे जॉन्सन याचा कायमचा काटा काढण्यासाठी सॅन्ड्रा हिने वेगवेळया काईम वेब सिरीज पाहिल्या. त्यानंतर जॉन्सन याला संपवण्याचा कट रचला. त्यासाठी मुलीचा प्रियकर ॲग्नेल कसबे याला सोबत घेतला. त्यानंतर ३० मे रोजी रात्रीचे वेळी जॉन्सन याचा त्याच्याच घरातच डोक्यात वरवंटयाने मारून तसेच मानेवर चाकूने वार करून खून केला.
सॅन्ड्रॉ लोबो यांनी पतीचा खून करत पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह पेट्रोल टाकून जाळला. त्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावली. ३० मे रोजी झालेल्या या खुनाचा तपास पोलिसांनी पाच-सहा दिवसांत २३० सीसीटीव्ही फुटेज पाहून तपास लावला. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी ॲग्नेल कसबे आणि सॅन्ड्रा लोबो यांना अटक केली आहे. आरोपींनी ॲग्नेल कसबे याचे आरोपी महिलेच्या अल्पवयीन मुलीसोबत होते प्रेम संबंध असल्याचा प्रकार पोलिसांच्या तपासात उघड झाला.
What's Your Reaction?