स्वतःच्या वादीसाठी दुसऱ्याची म्हैस मारणाऱ्यांची संख्या वाढत आहे! डॉ. वंजारे
बीड प्रतिनिधी:- खालापूरी येथील सत्ताधारी आणि विरोधक म्हणजे आत्ताचे सत्ताधारी एकच माळेचे मनी आहेत असे दिसत आहे मोठ्या अश्याने सत्तापालट झाली लोकांना मोठमोठी प्रलोभने दिली पण आजपर्यंत एकही विधायक काम खालापुरीत झालेलं नाही .सत्ता नसताना ह्याव करू त्याव करू म्हणणारे आता झोपेच्या गोळ्या घेऊन झोपले आहेत की काय हेच आता विचारावं लागेल.खालापूरी ची जनता राजकारण्याचे प्रलोभने आणि आश्वासने एकूण अपेक्षाभंग झालेला आहे सगळेच एकच माळेचे मनी आहेत असे दिसत आहे .
जो तो आपापल्या झोळ्या भरायला आ वासून आहे जनता मात्र निव्वळ उपाशी असून राजकीय नेते तुपाशी आहेत अशी परिस्थिती असताना मागचा सत्तापालट होताना दिलेले आश्वासन स्मार्ट व्हीलेज, जळालेली डीपी तात्काळ देणे,वर्गणी न करता सरपंच देणारा असावा,नाल्या रोड अशी हलकी कामे न करता विधायक काम जे पिढ्यान् पिढ्या टिकेल असे कार्य करू,गावात शमशान घाट,धोबी घाट,वृक्षारोपण,सिंचन, शिक्षण,स्वच्छता,यावर अजून काहीच नाही फक्त गावगाडा हातात घ्यायचा कूपन वाला मॅनेज करायचा,चारपाच टकूचे हाताखाली धरायचे आणि गावाला येड्यात काढून स्वतःचा स्वार्थ साधायचा हेच आजकाल प्रत्येक गावात चालू आहे .माझ्याकडे काही जुन्या जाहीरनामे,भाषणे आणि बरच काही मटेरियल आहे ज्यात लोकांनी अवाढव्य घोषणा केल्या आहेत अडमाप आश्वासने दिली आहेत जाहीरनामा इतका आहे की एखाद्या आमदाराचा नसेल पण प्रत्यक्षात कार्य शून्य असून फक्त टीका टिप्पणी आणि आश्वासने देऊन गाव भुलून काढायचा लोकांना नोकरीला लावतो ,तहसीलदार,कलेक्टर,आयुक्त ,मंत्रालय अश्या अनेक लांबलांब ओळखी असण्याचा आव आणून सामान्य जनतेची सर्रास लूट करण्याचा ज्याही लोकांनी कट रचला आहे तो हाणून पाडला पाहिजे आत्तातरी तरुणांनी मनुवादी व घरफोड्या व्यक्तींना खड्यागत बाजूला सारलं पाहिजे जनतेचा हित ज्याने दुखावलं त्याला योग्य ठिकाणी जागा दाखवली पाहिजे .गावात धर्मवाद चालू आहे ,जातीयवाद चालू आहे जुने नवे मिल बाटके खायेंगे अस बोलून तुला काही मला काही अस म्हणून दोन चार टकुचे गाव हकतात त्यांना ते गावचे कामकरी ,सेवक आणि शेतकऱ्यांचे हाताखालचे कार्यकारी मंडळ आहात हे कोणीतरी सांगण्याची गरज आहे .सत्ता आली की डोक्यात हवा शिरल्यावर वागणं सोडून द्यावं घराघरात बाप लेक ,चुलता पुतण्या ,भावकी आणि बांध ह्यावरून भांडणे लावणाऱ्या खालच्या दर्जाच्या लोकांपासून गाव दूर ठेवायला पाहिजे ,आमच्या दैवताची अव्हहेलना करणाऱ्या तुच्छ विचार सरणीच्या लोकांना समाजात नेतृत्व करण्याचा अधिकार नाही हे लक्षात घेऊन सर्व गावकरी विकासाची तत्पर राहून सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य आणि गावकरी ग्रामस्थ यांची विकासाचा रपाटा धरायला पाहिजे आग्रह केला पाहिजे नसता 'आले गेले छप्पन तू गेला राहिले पचपण' हा कार्यक्रम उचित नाही. गावात फक्त एकच धर्माची सन उत्सव जोमात साजरे करायचे ,विचारांची देवाणघेवाण होईल असे कार्यक्रम घ्याचे नाही,जत्रा मध्ये तरुणाईला खायला प्यायला पैसे देऊन फक्त उडवा उडव करून बिना शिकलेल्या लोकांनाही नोकरीला लाऊ असे आगावू प्रलोभने देऊन सत्तेत यायचं आणि मग उगाच लोकांचा भ्रम निराश करून कार्यक्रम संपवायचा हेच आजकाल सगळीकडे चालू आहे .माणसाने सत्य वागावं अंथरूण पाहून हाथ पाय पसरावे असा सबुरीचा सल्ला राजकीय अभ्यासक तथा सामाजिक कार्यकर्ते डॉ जितीनदादा वंजारे खालापूरीकर यांनी दिला.
What's Your Reaction?