चोरट्याने सोन्याचे दुकान फोडले, 25 कोटीचे हिरे आणि सोने लंपास

चोरट्याने सोन्याचे दुकान फोडले, 25 कोटीचे हिरे आणि सोने लंपास

दिल्ली (क्राईम)दिल्लीमध्ये 20 ते 25 कोटींच्या दागिन्यांची चोरी झाली आहे. उमराओ सिंह या शोरूममधून सोमवारी चोरांनी सर्वच्या सर्व दागिने चोरून नेले. रविवारी रात्री दुकान बंद करून मालक घरी गेले. सोमवारी दुकान बंद असतं. आज सकाळी दुकान उघडल्यावर दागिने लंपास झालेले दिसले. 

देशाची राजधानी दिल्लीतील जंगपुरा येथील ज्वेलर्सच्या शोरूममध्ये कोट्यवधींची चोरी झाली आहे. दुकानात ठेवलेले 20 ते 25 कोटी रुपयांचे हिरे आणि सोन्याचे दागिने चोरट्यांनी पळवून नेल्याचं शोरूम मालकांचं म्हणणं आहे. जंगपुरा येथील ज्या शोरूममध्ये चोरट्यांनी हात साफ केला, ते उमराव सिंह आणि महावीर प्रसाद जैन यांचं शोरूम आहे. दुकानात 20 ते 25 कोटी रुपयांचे हिरे आणि सोन्याचे दागिने ठेवण्यात आल्याचं शोरूम मालकानं सांगितलं आहे. जंगपुरा बाजार सोमवारी बंद असतो. त्यामुळे रविवारी शोरूम बंद केल्यानंतर मालक थेट आज (मंगळवारी) शोरुममध्ये गेले. त्यांनी दुकानाचं टाळं उघडलं आणि पाहिलं, तर त्यांना धक्काच बसला. 

शोरुम मालकांनी दिलेल्या माहितीनुसार, शोरूममध्ये ठेवण्यात आलेले सर्वच्या सर्व दागिने चोरट्यांनी लंपास केले होते. दार उघडलं त्यावेळी एकही दागिना शोरूममध्ये नव्हता. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि तात्काळ तपास सुरू केला. टाळं तर शोरूम मालकांनी उघडलं मग चोरांनी चोरी कशी केली? असा प्रश्न सर्वांच्यात मनात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी छत कापलं आणि तिथून शोरूममध्ये प्रवेश केला आणि हात साफ केला. 

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow