मच्छिंद्र गडावर निगमानंद महाराज यांच्या चतुर्थ पुण्यस्मरण निमित्त हजारो भक्त समाधीवर नतमस्तक
शिरूर कासार :- तालुक्यातील मच्छिंद्रगड येथे ब्रम्हलिन संत निगमानंद महाराज यांच्या चतुर्थ पुण्यतिथी सोहोळा महंत जनार्दन महाराज मच्छिंद्रगड यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवार ( ता.२० ) रोजी आयोजित करण्यात आला होता. या वेळेस संत महंत ब्रम्हवृंद, सह हजारो भाविकांचा जनसागर मच्छिंद्रगडावर लोटला होता. बाबांच्या समाधीवर भविक भक्तगण नतमस्तक झाले होते.
मच्छिंद्रगडावर बांबाच्या चतुर्थ पुण्यतिथीनिमित्त दोन दिवस धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.पहील्या दिवसी संभाजी महाराज यांचे किर्तन सेवा संपन्न झाली होती.तर दुसऱ्या दिवसी संत निगमानंद महाराज यांच्या भव्यदिव्य मंदिरातील समाधीवर वेदशास्त्रसंपन्न महेश महाराज जोशी मातोरीकर यांच्या मार्गदर्शनाखाली ब्रम्हवृंदा च्या मंञघोषात महाआभिषक करण्यात आला.त्या नंतर देवगड येथील भास्कर महाराज गिरी यांचे आमृतुल्य आसे किर्तन झाले.
या कार्यक्रमास व्यासपीठावर महंत शिवाजी महाराज नारायणगडकर, नामदेव महाराज शास्त्री बोरी पिंपळगाव, बाळकृष्ण महाराज सुडके, बाबासाहेब महाराज बडे, संतोष महाराज भारती ,रामगिरी महाराज येळीकर, भानुदास महाराज शास्त्री, तीर्थराज महाराज पठाडे ,नारायण महाराज दगडवाडी,महेश महाराज शास्ञी,नवनाथ महाराज शास्त्री, हनुमान महाराज शास्त्री ,उद्धव महाराज शास्त्री ,रामेश्वर महाराज शास्त्री, श्रीरंग महाराज, मसने महाराज, अनिल महाराज वाळके ,अंकुश महाराज झिरपे, जालिंदर महाराज झिरपे, गणेश महाराज वारंगे, अमोल महाराज डोंगरे हे उपस्थित होते.त्याचे मच्छिंद्रगड संस्थान च्या वतिने मठाधिपती महंत जनार्दन महाराज, रामेश्वर महाराज, उद्धव महाराज यांनी सन्मान केला.या कार्यक्रमाला जिल्ह परिषद सदस्य रामराव खेडकर, बाळासाहेब नागरे,भास्करराव थिटे,सरपंच रमेश तळेकर, अर्जुन बप्पासाहेब खेडकर, पञकार चंद्रकांत राजहंस, शंकर भालेकर, तुकाराम धस,डिगांबर गायकवाड, गोरख खेडकर सह हजारो भाविक भक्तगण उपस्थित होते. सर्व भाविक भक्ताला महाप्रसाद वाटप करण्यात आला त्याची यवस्था परीसरातील गावातील ग्रामस्थासह निगमानंद विद्यालय निमगाव, तळनेवाडी येथील शिक्षक, विधार्थी ने केली.
What's Your Reaction?