पिक विमा भरण्यासाठी तीन दिवसाची मुदत वाढ! कृषी मंत्री धनंजय मुंडे
शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी ऑनलाईन पीक विमा भरण्यासाठी वेबसाईट हँग चालत असल्याने अनेक शेतकरी पिक विमा पासून वंचित राहिले होते. त्यासाठी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी पिक विमा भरण्यासाठी आणखी तीन दिवसाची मुदतवाढ दिली आहे.
यावेळी कृषी मंत्री धनंजय मुंडे आपल्या ट्विटद्वारे म्हणाले या खरीप हंगामात शेतकरी बांधवांनी एक रुपयात पीक विमा भरण्यास उत्तम प्रतिसाद दिला असून आतापर्यंत दीड कोटी पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी विमा अर्ज भरले आहेत. तांत्रिक कारणांनी कोणत्याही शेतकऱ्यांचा विमा भरणे मागे राहू नये, यासाठी ऑनलाइन विमा अर्ज करण्यासाठी 3 दिवसांची मुदत वाढ देण्यात आली आहे. उर्वरित शेतकरी बांधवांनी आपला विमा अर्ज 3 ऑगस्टच्या आत ऑनलाइन भरून घ्यावा. असे आवाहन राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे
What's Your Reaction?