खालापुरीत टँकर चालू करा! डॉ. जितिन वंजारे

खालापुरीत टँकर चालू करा! डॉ. जितिन वंजारे

बीड प्रतिनिधी : खालापूरी गावात टँकर चालू न केल्यास तत्काळ कारवाई केली जाईल .जनसामान्यांचा प्रचंड जमाव घेऊन ग्रामपंचायत वर मोर्चा काढणार असा इशारा सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर जितिन वंजारी यांनी दिला आहे.

 पाण्यात होणारा भ्रष्टाचार उघड केला जाईल,शासनाचा निर्णय अंमलात न आणणाऱ्या वर गावकरी आणि नागरिकांनी अविश्वास का आणू नये अशी याचिकाही दाखल केली जाणार आहे. त्यामुळे अगदी पाच दिवसात खालापुरी येथे पाण्याचे टँकर चालू केले गेले नाही तर कायदेशीर कार्यवाही खालापूरी ग्रामपंचायत वर केली जाईल.आजूबाजूच्या गावात टँकर चालू होतात मग खालापूरी येथे का होत नाहीत? आपला माणूस कुठे कमी पडतोय ? ह्याचा जबाब विचारण्यासाठी आख्ख गाव घेऊन हंडा मोर्चा काढला जाणार आहे तरी ग्रामपंचायत ला पाच दिवसाचा वेळ देत असून तितक्या दिवसात काम नाही झाल्यास मा.तहसील कार्यालय शिरूर कासार आणि खालापूरी ग्रामपंचायत वर महिला बाल वृद्ध घेऊन हंडा मोर्चा काढला जाणार आहे. हा पाण्यासाठी रणसंग्राम असून मूलभूत गरजा पूर्ण करता येत नसेल तर आपापली जागा सोडा असा इशाराही यावेळी सामाजिक कार्यकर्ते डॉ जितीन दादा वंजारे खालापूरीकर यांनी दिला आहे.पाण्यासारखी पुण्याची महत्त्वाची गोष्ट गावाला देता येत नसेल तर तुम्ही दुसरं काय देणार ? गावातील गरीब नागरिक पाण्यासाठी पैसे मोजत आहेत ,रोज शंभर रुपये पाण्याला खर्च करत आहेत ही अपमानास्पद गोष्ट आहे आतापर्यंत अशी गोष्ट घडली नव्हती कोव्हीड सारख्या महामारीतही गाव चांगला सांभाळला होता पण आज त्यापेक्षा ही बिकट संकट गावावर असताना येथील नेते शेपूट घालून गप्प आहेत,अरे राजकारण सोडा,गावातील हनुमान महाराज सप्ताह आणि यात्रेत खादीचे पांढरे कपडे घालून हिंडणाऱ्या स्वयंघोषित नेत्यांनी स्वतच्या बायकोला आईला बहिणीला विचारा घरात पाणी नसल्यावर काय होते आणि ते जर आपली ग्रामपंचायत देत नसेल तर तिचं करायचं काय? आपले हक्क आणि अधिकार गुलाम ठेऊन पांढरे कपडे घालू नका ती सोन्याच्या साखळदंडातली गुलामी आहे लक्षात असू द्या.कमीत कमी बायकांसाठी,घरच्यांसाठी तरी रस्त्यावर या.घरातील गावाच्या सर्वांगीण विकासावर लक्ष द्या,शिक्षण,आरोग्य,मूलभूत सुविधा यावर ग्रामपंचायत ने लक्ष देणं गरजेचं आहे ते जर होत नसेल तर संघर्ष आपण करणार असा इशारा यावेळी सामाजिक कार्यकर्ते डॉ.जितीन वंजारे यांनी दिला. गावात पाणी नाही काही हरामखोरांनी योजनाच्या योजना खाल्ल्या पाण्याचा टिपूस येऊ दिला नाही तरीही आपण गप्प , पाइपलाइन उकरून खाल्ली भ्रष्टाचार केला तरीही आपण गप्प कुठवर गप्प राहणार आहात गावाला जोपर्यंत पाणी येत नाही तोपर्यंत संघर्ष चालूच ठेवणार ,आता जागे व्हा सगळे एकत्र या पाण्याचा संगर पार पाडू गावाला शुद्ध पाणी आलेच पाहिजे.लोकांना राजकारण करुद्या मी सामाजिक कार्यकर्ता मा.सम्राट डॉ जितीनदादा वंजारे खालापूरीकर तुमच्या साठी कायम रस्त्यावर उतरून संघर्ष करेल गावाला पाणीच मिळवून देऊ असा विश्वास देतो.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow