मंत्री संजय राठोड यांच्या मनात नेमकं काय?

मंत्री संजय राठोड यांनी दोन दिवसांपूर्वीच बीडमध्ये आपल्याला उद्धव ठाकरे यांची साथ सोडायची नव्हती. पण समाजाच्या विकासासाठी आपल्याला शिंदे गटासोबत जाण्याचा निर्णय घ्यावा लागला, असं मोठं वक्तव्य केलेलं. त्यानंतर ते आज दिल्लीत दाखल झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

मंत्री संजय राठोड यांच्या मनात नेमकं काय?

मंत्री संजय राठोड यांनी दोन दिवसांपूर्वीच बीडमधील कार्यक्रमात मोठं वक्तव्य केलं होतं. राज्यात सत्तांतर झालं त्यावेळी आपल्याला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत राहायचं होतं. पण धर्मगुरू बाबूसिंग महाराज यांनी शिंदे गटासोबत जाण्याचा सल्ला दिला होता. पोहरादेवीच्या विकासासाठी शिंदे गटात जाण्याचा सल्ला धर्मगुरुंनी दिला. त्यामुळे आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आल्याचं संजय राठोड नुकतंच म्हणाले होते.

संजय राठोड नेमकं काय म्हणाले?
संजय राठोड दोन दिवसांपूर्वी बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी आपल्या भाषणात महत्त्वाचं वक्तव्य केलं. “जेव्हा राज्यात घडामोडी झाल्या पक्षात फूट पडली तेव्हा मी ठरवले होते आपण उद्धव ठाकरे यांना सोडून जायचे नाही. बाबू महाराज यांनी मला सांगितले, आपल्या पोहरादेवी गडाचा विकास करायचा असेल तर आपल्याला शिंदे गटासोबत जावे लागेल. त्यानुसार मी शिंदे गटात गेलो”, असं संजय राठोड म्हणाले.

“मला गुहावटीला जायचं नव्हतं. आमचे धर्मगुरू बाबूसिंग महाराज यांनी जायला सांगितले. समाजासाठी मला जावे लागले. पोहरादेवीचा आदेश माझ्यासाठी अंतिम आहे. समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी मला महाराजांनी सांगितले. आमच्या समाजाचे नेते हरिभाऊ राठोड केसीआरमध्ये गेले, मी त्यांना शुभेच्छा दिल्या”, असंही ते म्हणाले.

“संख्याबळ ज्याचा तो मुख्यमंत्री होईल. या सरकारमधून समाजाचे अनेक विकास कामे मार्गी लागली. पोहरादेवीचा देखील विकास होणार आहे”, असा दावा संजय राठोड यांनी केला.

सर्व बातमी आत्ता एकाच क्लिक वर Downloadअँप 

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow